मुंबई – राज्यात म्हाडाच्या घरांसाठी ३ ते ४ वर्षांच्या कालावधीत पैसे भरण्याची सुविधा मिळणार आहे. म्हाडाकडून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. म्हाडाच्या पैसे भरण्याच्या नियमात मोठा बदल होणार आहे. राज्यात येणाऱ्या काळात ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम अंतर्गत मुंबईत घरे उभारण्यात येणार आहेत. खासगी बिल्डर बिल्डिंग पूर्ण होईपर्यंत ग्राहकांकडून स्लॅबनुसार पैसे आकारतात. तसेच म्हाडा योजनेतही नागरिकांना टप्प्याटप्प्याने म्हणजे ३ ते ४ वर्षांच्या कालावधीत म्हाडाच्या घरांसाठी पैसे भरण्याची सुविधा मिळणार आहे, असे राज्यातील म्हाडाच्या कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे.
म्हाडाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. व एकदम रक्कम भरावी लागणार नाही. राज्यात सध्या म्हाडाच्या इमारतीला ओसी मिळताच विजेत्यांना देकारपत्र पाठवण्यात येते. त्यानंतर विजेत्यांना २५ टक्के पैसे भरण्यासाठी ४५ दिवस व उर्वरित ७५ टक्के पैसे भरण्यासाठी त्यापुढील ६० दिवसांचा वेळ मिळतो. पैसे भरण्यासाठी कमी कालावधी मिळत असल्याने विजेत्यांची बँकेत धावपळ होते. अनेकांना वेळेत कर्ज मिळत नसल्याने घर गमवावे लागते.
येत्या काळात म्हाडा ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम अंतर्गत मुंबईत घरे उभारणार आहे. म्हणजेच इमारत निर्माणाधीन असतानाचा त्यातील घरांचा लॉटरीत समावेश करणार आहे. त्यानंतर विजेत्यांकडून खासगी बिल्डरांप्रमाणे टप्प्याटप्याने पैसे घेणार आहे. लॉटरीत घर लागल्यास सुरुवातीला १० टक्के पैसे भरावे लागणार आहे. पुढील ६ ते ८ महिन्यांत १५ टक्के पैसे भरावे लागतील. दुसऱ्या वर्षी २५ टक्के आणि तिसऱ्या वर्षी २५ टक्के पैसे भरावे लागणार आहे.
इमारतीला ओसी मिळाल्यानंतर उर्वरित २५ टक्कयांचा हप्ता भरावा लागणार आहे. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशन होणार आहे. सध्या इमारतीच्या संपूर्ण बांधकामाचा खर्च म्हाडाला आपल्या तिजोरीतून करावा लागत आहे. तर लॉटरीनंतर विजेत्यांकडून पैसे येईपर्यंत वाट पहावी लागते. या स्कीमुळे म्हाडाला स्लॅबनुसार विजेत्यांकडून पैसे मिळणार आहेत. त्यामुळे प्राधिकरणाच्या देखील पैशांची बचत होणार आहे. म्हाडा लॉटरी विजेत्यांना टप्प्याटप्प्याने पैसे भरावे लागणार आहे.
त्यांच्यावर एकाच वेळी आर्थिक भार पडणार नाही. उलट पैसे जमतील तसे वेळोवेळी भरता येणार आहेत. तसेच एखाद्याला बँकेतून कर्ज घ्यावयाचे असेल तर, ते सहजपणे मिळू शकणार आहे. जसे म्हाडाच्या घरांचे काम पूर्ण होईल, त्याप्रमाणे बँकेतून म्हाडाला पैसे मिळतील. तर याबाबत माहिती देताना म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे म्हणाले आहेत की, सध्या मुंबईत म्हाडाकडे तयार घरांची संख्या कमी आहे.ॲडव्हान्स काँट्रिब्युशन स्कीमअंतर्गत गृह प्रकल्प सुरू करतानाच त्याची लॉटरी काढण्याचा विचार आहे.
त्यामुळे राज्यातील म्हाडाची घरे पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे. आणि विजेत्यांनाही आर्थिक ओढाताण न करता पैशाचे नियोजन करणे शक्य होणार आहे. त्यामूळे आता राज्यातील म्हाडाच्या घरांसाठी टप्याटप्याने पैसे भरायची सुविधा म्हाडाकडून मिळणार आहे, असे राज्यातील म्हाडाचे अधिकारी अनिल वानखेडे यांनी सांगितले आहे.




