राशीभविष्य – आज ७ मार्च २०२६ , आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज महिला आवडत्या गोष्टीसाठी वेळ काढतील, प्रेम प्रकरणांमध्ये आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात संधीचे सोने करणे तुमच्या हातात राहील, नवीन ओळखी होतील, पण अति विचारामुळे स्वतःचे नुकसान करून घ्याल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज आवश्यक त्यांना सहकार्याचा हात द्याल, नावलौकिक वाढेल, बौद्धिक कामे आवडतील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रसिद्धी मिळेल लेखकांना लिखाणात प्रगती करता येईल, करिअरमध्ये विचारांना स्थिरता दिली तर यश मिळवू शकाल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज थोडासा अशीपणा आणि लवकर निर्णय न घेतल्यामुळे नुकसान संभवते, उत्तम संधी मिळण्यासाठी कष्टाला पर्याय नाही.
कन्या रास (Virgo)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज एखाद्या कामासाठी विलंब अडथळे यांचा सामना करावा लागेल, महिलांच्या गुणांची कदर न झाल्यामुळे त्या थोड्या नाराज होतील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज साहित्य आणि सौंदर्य याबाबतीत तुमची कल्पनाशक्ती काम करेल, कर्तव्यापेक्षा भावनांना जास्त महत्त्व द्यावे.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रत्येक कामामध्ये अति संवेदनशीलता आणि नाजूक वृत्ती ठेवल्यामुळे इतरांना थोडी मुडी वाटाल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न प्रत्येक आव्हानांना सामोरे जातील, काळ काम वेग याचे गणित जमवा.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या गुणांचा सदुपयोग करून घ्या, जोडीदाराचे मन राखावे लागेल.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज इतरांच्या गैरसमज दूर करावे लागतील, आर्थिक नियोजनांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता राहील.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज चैनीच्या वस्तूंच्या खरेदीचा मूड राहील, महिलांना कुटुंबात तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)




