संभाजीनगर – समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे, या प्रकरणात २ जणांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर जेसीबीच्या सावलीखाली काही कामगार जेवायला बसले होते, ट्रकने जबर धडक दिल्यामूळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर ४०६ पॉईंटवर सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू होते. दुपारची वेळ झाल्यामुळे कामगार जेवणासाठी बसले होते. कामगारांनी जेवणासाठी महामार्गावर उभ्या असलेल्या जेसीबीच्या सावलीखाली मागे बसले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर ही घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर ४०६ पाँईटवर हा अपघात झाला आहे. सीसीटीव्ही बसवण्यासाठी आलेले कामगार जेवणासाठी महामार्गावर जेसीबीच्या मागे बसले होते, त्यावेळी भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरजवळील समृद्धी महामार्गावर दुपारच्या वेळी ही घटना घडली आहे.
समृद्धी महामार्गावर ४०६ पॉईंटवर सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू होते. दुपारची वेळ झाल्यामुळे कामगार जेवणासाठी बसले होते. कामगारांनी जेवणासाठी महामार्गावर उभ्या असलेल्या जेसीबीच्या मागे बसले होते. त्याचवेळी एक वेगाले आलेला ट्रक जेसीबीवर येऊन आदळला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडक दिल्यानंतर ट्रकने जेसीबीला काही अंतर फरफटत नेले आहे. जेवणासाठी बसलेल्या कामगारांना पळ काढण्यासाठी वेळच मिळाला नाही. जेसीबी आणि ट्रकच्या धडकेत सापडून २ कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गावर पाँईंट ४०६ वर सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी एक पूल आहे, पुलाच्या बाजूला हे सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू होते. दुपारची जेवणाची वेळ झाली. समृद्धी महामार्गावर आजूबाजूला अशी फार बसायला जागा नव्हती. त्यामुळे कामगारांनी जेसीबी मशीनच्या मागे जेवायला बसले होते. लोखंडाचे रोल घेऊन जाणाऱ्या मोठ्या ट्रकने जोरात जेसीबीला धडक दिली आहे.
खाली बसलेले कामगार हे जेसीबी आणि ट्रकच्या मध्येच सापडले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या. जखमी कामगारांना संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे पुन्हा एकदा प्रवास करणार्या नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. याप्रकरणात संभाजीनगर पोलिस अधिक तपास करत आहेत. या समृद्धी महामार्गावर आतापर्यत हजारो लोकांचे मृत्यू झाले आहेत.




