जळगाव – चाळीसगावमध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. जळगाव पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणात वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण असतो, अनेकदा याच तणावातून आत्महत्या केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. निलेश पाटील असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
कोदगाव येथील घरातच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे घडली आहे. निलेश पाटील यांच्या निधनाने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पोलिसांच्या तपासाला गती येणार आहे. तसेच, कुटुंबीय आणि नातेवाईकांकडेही विचारपूस केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात अधिक तपास चाळीसगाव पोलिस करत आहेत.





