पिकअप टेम्पो पलटी झाल्यामुळे अपघात; या अपघातात एकाचा मृत्यू २० जण जखमी

SHARE:

रायगड – रायगड जिल्ह्यात पिकअप टेम्पो पलटी झाल्यामुळे अपघात झाला आहे, या अपघातात एकाचा मृत्यू २० जण जखमी झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये २१ जणांनी भरलेला पिकअप टेम्पो उलटला आहे. तर या टेम्पोमधून जाणारे सर्वजण हे गेल कंपनीत काम करणारे कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. ते अलिबागला जात होते. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातून ही रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. २१ जणांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो पलटी झाल्यामुळे एक जण जागीच मृत्यूमुखी पडला आहे, तर २० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

हा अपघात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बोरघर पुलाजवळ घडला आहे. वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. माहितीनुसार, अलिबागमध्ये गेल कंपनीमध्ये काम करणारे काही कामगार अलिबाग तालुक्यातील रामराज येथे जात होते. यावेळी त्यांना घेऊन जाणार्या पिकअप टेम्पोच्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप टेम्पो रस्त्यावर पलटी झाला आहे. या वाहनात एकूण २१ जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

रायगड जिल्ह्यातील या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अलिबाग पोलिसांनी मदतकार्य सुरू केले आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात अधिक तपास अलिबाग पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा