पुणे – अल्वपवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अंमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे, तर या प्रकरणात ४ जणांना अटक करण्यात आले आहे. पुण्यात अल्वपवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अंमली पदार्थ तस्करी करणारी एक मोठी टोळी पकडली आहे. या कारवाईत आरोपींच्या फोनमध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील ७६ जणांची यादी सापडली आहे, या घटनेने पुण्यातील पोलिस ही चक्रावुन गेले आहेत. पुण्यामध्ये १४ गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार राठ्या गोपाळ राठोड याने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते.
तो कोंढवे-धावडे परिसरात येणार असल्याची माहिती पुणे उत्तमनगर पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणात १४ गुन्हे दाखल असलेला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास करणाऱ्या उत्तमनगर पोलिसांसमोर दुसराच मोठा खुलासा झाला आहे. या कडक कारवाईत अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट सापडले आहे. मुलीचे अपहरण करणाऱ्या गुन्हेगाराला पकडल्यानंतर त्याच्याकडे एमडी ड्रग्ज सापडले आहे. ज्यामध्ये पुणे शहरात पसरलेल्या एका मोठ्या अंमली पदार्थ तस्करी रॅकेटचा भांडाफोड झाला आहे.
या प्रकरणात उत्तमनगर पोलिसांनी ८.१९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. तर या प्रकरणात एकूण ८ आरोपींपैकी ४ जणांना अटक केले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यातून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ तस्करी करणार्या रॅकेटचा उलगडा झाला आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंह क्षीरसागर यांनी दिली आहे. पुणे उत्तमनगर पोलिसांनी सापळा रचून राजन गोपाल नायर, जतीन जयवंत कदम आणि शुभम संतोष दहिभाते या ३ आरोपींनाही अटक केली आहे.
या प्रकरणात एकुण ८ आरोपींपैकी ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींकडून अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात लाखोंची उलाढाल झाली आहे. आणि ७६ जणांची यादी मोबाइल मध्ये मिळाली आहे. पुणे पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत. त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे.मोबाईलमधील आर्थिक व्यवहारांवरून एमडी ड्रग्ज विक्रीतून १० लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात २५० ते ३०० जणांसोबत पैशांचा व्यवहार झाल्याचे तपासात उघड आले आहे. एमडी ड्रग्ज घेणारे आणि एमडी ड्रग्ज विकणारे अशा ७६ जणांची यादी पोलिसांच्या हाती लागली आहे. लवकरच त्यांच्यावरही कडक कारवाई होणार आहे, असे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि सह-आयुक्त रंजन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील उत्तमनगर पोलिसांनी ही कडक कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाकडून ८ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी शुभम दहिभाते याच्या घरातूनही पुणे पोलिसांनी ५.१२ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. पुणे शहरातील या अंमली पदार्थ तस्करी करणार्या रॅकेटचे संबंध आणखी कोणाशी आहेत का? याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे आणि त्यांचे पोलिस पथक करत आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.





