मालेगाव – महानगरपालिकेत एसआयआर प्रक्रियेवरून, एमआयएम व इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांमध्ये मोठा वाद झाला आहे. मालेगावच्या महानगरपालिकेत महासभेत सत्ताधारी नगरसेवकांत एकमेकांशी वाद झाला आहे. मालेगाव महानगरपालिकेत मतदार याद्यांच्या पुनर्निरिक्षण पडताळणीच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि मालेगाव सेक्युलर फ्रंटचे नगरसेवक एकमेकात मोठा वाद झाला आहे. मालेगावमधील महानगरपालिकेतील सत्ताधाऱी नगरसेवकांमधील मतभेद आता समोर आले आहेत.
राज्यातील निवडणूक आयोगातर्फे सध्या मतदार यादी पडताळणीचे काम सुरू आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेत नियुक्त करण्यात आलेल्या काही केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी बीएलओ हे काम स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या कामात व्यत्यय निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादी पडताळणी व मतदार यादी पुनर्निरीक्षणाच्या कामात मतदारांना महापालिकेतर्फे मार्गदर्शन व सहाय्य साहाय्य करावे, या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर नसरीन बानो शेख यांच्या अध्यक्षतेखाली या मालेगावात महानगरपालिकेत महासभेचे आयोजन करण्यात आले होते.
मालेगाव महानगरपालिकेतर्फे एसआयआर प्रक्रियेच्या कामासाठी बीएलओ यांना मदतीसाठी मानधन तत्वावर काही तरुणांची नियुक्ती करावी, अशी सूचना समाजवादी पार्टीचे गटनेते मुस्तकीम डिग्निटी यांनी मांडली होती. त्यानंतर मतदार यादीच्या कामासाठी खाजगी व्यक्तींना नियुक्त करता येते का, असा प्रश्न शिवसेनेचे नरेंद्र सोनवणे यांनी उपस्थित केला होता. असे तरुण नियुक्त केले गेले तर त्यांना मानधन देण्यासाठी आर्थिक तरतूद कशी करणार, अशी विचारणा एमआयएमचे खालीद परवेज यांनी उपस्थित केला. ही चर्चा सुरू असतानाच खालिद परवेज व अन्य नगरसेवक महापौरांच्या हौदासमोर आले.
त्यावरून एमआयएम व इस्लाम पक्षाच्या सदस्यांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर या दोन्ही पक्षांचे सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यामुळे मालेगाव महानगरपालिका सभागृहात काही वेळ गोंधळ उडाला. त्यावरून काही काळ तणाव निर्माण झाला. मालेगाव महानगरपालिका सभागृहातील विविध पक्षीय सदस्यांनी आक्रमक झालेल्या एमआयएम व इस्लाम पक्षाच्या सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या गोंधळानंतर एमआयएमचे सदस्य महासभेवर बहिष्कार घालत सभागृहाबाहेर पडले.
या गोंधळानंतर एसआयआरच्या कामात मतदारांना साहाय्य करण्यासाठी मानधन तत्वावर तरुणांची नियुक्ती करण्याचा ठराव मालगाव महानगरपालिका महासभेत मंजूर करण्यात आला आहे. मालेगाव महानगरपालिकेतील महासभेला उपमहापौर शान-ए-हिंद, आयुक्त रवींद्र जाधव, अतिरिक्त आयुक्त रोहिदास दोरकुळकर, उपायुक्त हेमलता डगळे हे सर्वजण उपस्थित होते. या घटनेनंतर मालेगाव महानगरपालिकेतील तणाव शांत झाल्याचे पाहायला मिळाले आहे.





