दोन सख्या बहिणीने चालविलेल्या अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा भांडाफोड; २ आरोपींना अटक

SHARE:

संभाजीनगर – अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे, तर या प्रकरणसत २  जणांना अटक करण्यात आली आहे. संभाजीनगर शहरातून भयानक घटना समोर आली आहे. मोठे गर्भपाताचं रॅकेट उघडकीस आले आहे. संभाजीनगरमधील दोन सख्ख्या बहिणी एका नर्सच्या मदतीने हे गर्भपाताचे रॅकेट चालवत होत्या. पोलिसांनी संभाजीनगरात गर्भपाताचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. संभाजीनगरमध्ये मागील काही दिवसांपासून अवैध गर्भपाताचे प्रमाण वाढले आहेत. महिनाभरापूर्वी संभाजीनगरमध्ये एक गर्भपाताचं रॅकेट उघडकीस आले होते.

संभाजीनगरमधील एमआयडीसी सीडको परिसरात एका विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला जात होता. गरोदर महिलेला पोटावर झोपवून अत्यंत क्रूर पद्धतीने गर्भपात केला जात होता. आता परत संभाजीनगरमध्ये शहरात दुसरे गर्भपाताच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला आहे. दोन सख्ख्या बहिणी एका नर्सच्या मदतीने हे रॅकेट चालवत होत्या. त्या महिला मागील दीड वर्षांपासून घरातच गर्भपात करत होत्या. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या रॅकेटचे धागेदोरे रेकॉर्डवरील गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत पोहोचले आहेत. गर्भपात करण्यासाठी आरोपी महिलांकडून ७० ते ८० हजार रुपयांचे पॅकेज घेतले जात होते.

संभाजीनगर पोलीस आणि महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रविवारी गर्भपाताचे हे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. या प्रकरणात वर्षा बाबासाहेब जाधव आणि उज्ज्वला विट्ठल गायकवाड या दोन महिलांना पकडले आहे. त्यां आरोपी महिलांकडे महिला रुग्णांना पाठवणाऱ्या सिल्लोडच्या डॉ. विकास मिठाराम आहेर यालाही पोलिसांकडून त्याच्या रुग्णालयातून अटक करण्यात आली आहे. वर्षा जाधवची साथीदार ज्योती पवार मात्र फरार झाली आहे.

पोलीस तिचा शोध घेत आहेत. सिल्लोड तालुक्यातील अटक केलेला डॉ. आहेर हा एमबीबीएस असून त्याची पत्नीही डॉक्टर आहे. काही दिवसांपूर्वी पूर्वी छोटा दवाखाना चालवणाऱ्या डॉ. विकास आहेरने मागील २ वर्षात ३ मजली इमारत उभी केली आहे. ही ३ मजली इमारत गर्भपाताच्या बेकायदेशीर जमा झालेल्या पैशांतून बांधल्याचा संशय संभाजीनगर पोलिसांना आहे. या घटनेचा अधिक तपास संभाजीनगर पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा