धाराशिव – उपमुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर असताना त्यांच्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांला नजरकैद केल्याचा प्रकार समोर आला आहे. धाराशिवमध्ये शिवसेनेचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या दौऱ्यापूर्वी शिंदेगट शिवसेनेचा पदाधिकारीच नजरकैदेत ठेवल्याची घटना उघड झाली आहे. शिंदे गट शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे यांनी व्हीआयपी दौऱ्यावेळी मोठा गोंधळ घातला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव धाराशिवमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली आहे, अशी धाराशिव पोलिसांनी माहिती दिली आहे. धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शिंदेगट शिवसेनेचचे पदाधिकारी नजर कैदेत ठेवण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यामधील युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अविनाश खापे आणि जिल्हा परिषदेचे पराभूत उमेदवार नितीन पाटील यांना धाराशिव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.धाराशिवमधील शिरढोण पोलिसांनी ही कडक करवाई केली आहे, सकाळी दोघांनाही धाराशिवमधील शिरढोण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर जिल्हा परिषदेला पराभूत असलेल्या नितीन पाटलांचाही एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांनाही ताब्यात घेतले आहे. शिवसेनेतल्या अंतर्गत गटबाजीमुळे गेल्या काही दिवसात हा वाद वाढत असल्याची माहिती मिळाली आहे.
धाराशिवमध्ये शिंदेगट शिवसेनेतील दोन गटातील वादामुळे यापूर्वी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यावेळी प्रचंड वाद झाला होता. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर येत असताना त्यांच्याच पदाधिकाऱ्यांवर नजर कैदेची कारवाई करण्यात आली आहे. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे न्याय मागणार अशी माहिती शिवसैनिक नितीन पाटील यांनी दिली आहे. शिवसेनेतील काही पदाधिकारी यांनी भाजपाच्या लोकांशी हातमिळवणी करत शिवसेनेतील एकनिष्ठ शिवसैनिकावर अन्याय केला आहे.
त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेवून न्याय देण्याची मागणी करणार आहोत, अशी माहिती शिवसैनिक नितीन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील तिकीट वाटपावरून नाराजी पसरलेली आहे. ज्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पक्षातील वाद वाढल्याचे पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये स्थानिक शिंदेगट शिवसेनेत अंतर्गत गटबाजी आणि वाद आता समोर आले आहेत.





