राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे केळी पिकांना मोठा फटका; भंडारा जिल्ह्यात उपनद्या आणि नाले कोरडे

SHARE:

नागपूर – राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे केळी पिकांना मोठा फटका बसत आहे, तर भंडारा जिल्ह्यात उपनद्या आणि नाले कोरडे पडले आहेत. तलावांचा जिल म्हणून ओळखले जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पाण्याचे भीषण संकट उभे राहिले आहे. भंडाऱा जिल्ह्यातील चुलबंद नदीचे पात्र कोरडे पडले आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेमुळे केळी पिकांना मोठा फटका बसला आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातही अनेक उपनद्या आणि ओढे-नाले कोरडे पडले आहेत. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातून वाहणाऱ्या चुलबंद नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

राज्यभरात उष्णतेच्या लाटेमुळे काही जिल्ह्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात आतापासूनच पाण्याची कमतरता जाणवत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांध्ये धरणांच्या व तलावांच्या जलसाठ्यामध्ये घट झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात उन्हाळी भातपिकांसह बागायती शेती वाचवण्यासाठी शेतकरी जमिनीत पाणी शोधत आहेत. भंडारा जिल्ह्यात ही उष्णतेच्या लाटेमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर ते दिघोरी या मार्गावरील प्रमुख चुलबंद नदी कोरडी पडली आहे.

भंडारा जिल्ह्यात नदीतील पाण्याचा प्रवाह व ओलावाही आता शिल्लक राहिलेला नाही. नद्या कोरड्या पडल्या आहेत. तरी राज्यातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या उन्हाळी भात पिकाला आणि पालेभाज्यांना वाचवण्यासाठी शेतकरी पाण्यासाठी चिंताग्रस्त आहेत. नदीपात्रात २० ते २५ फूट खोल खड्डे खोदून शेतकरी त्यावर मोटारपंप चालवत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा आणि जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यातील शेतकरी आपल्या पिकांना वाचवण्यासाठी पाण्याची शोधात आहेत. तर राज्यातील बळीराजावरील हे जलसंकट भविष्यात टळणार आहे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे व पाणी टंचाईमुळे शेतातील उभी पिके कडक उन्हात करपू नये, शेतकरी नदीपात्रात खोल खड्डे खोदून त्यावर मोटारपंप लावून भूगर्भातील पाणी बाहेर काढत आहे. राज्यात कडक ऊन आणि दुसरीकडे जमिनीखाली खोलवर गेलेली पाण्याची पातळी, यामुळे शेतकऱी पाण्यासाठी चिंताग्रस्त दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यामध्येही उष्णतेच्या लाटेचा केळी पिकांना मोठा फटका बसला आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरल्याने त्याचा फटका जळगाव जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील केळी बागांना बसला आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणी कमी असल्यामुळे केळी बागा सुकू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सध्या जळगावमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. जळगाव जिल्ह्यातील तापमान ४३ अंशावर पोहोचले आहे. त्याचा मोठा परिणाम जळगाव जिल्ह्यातील शेती पिकांवर होत आहे. जळगाव जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेमुळे केळी उत्पादक शेतकऱी चिंतेत आहेत. जळगाव जिल्ह्यात शेतीपिकांसह केळा पिकांना उष्णतेचा मोठा फटका बसलेला दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ७० हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होत असते.

एकाच आठवड्यात उष्णतेच्या लाटेने जळगाव जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील केळी बागांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर मोठे संकट उभे राहिले आहे. राज्यातील सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे व काही भागात भीषण पाणी टंचाईमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा