मुंबई – मुस्लिमांविरोधात गरळ ओकणार्या भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्हयातील परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याचा आणि पीडित मुलींची ओळख उघड केल्याचा ठपका ठेवत, त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्य अल्पसंख्याक आयोगाने केली आहे.
परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणी भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा म्हणाल्या होत्या कि आरोपीची सुनावणी नको, थेट एन्काऊंटर केला पाहिजे. या प्रकरणात जे व्हिडिओ प्रसारित झाले आहेत, त्यात सर्व हिंदू मुली दिसत आहेत. आरोपीचे कृत्य हे संताप आणणारे आहे. त्याचा खरे तर एन्काऊंटर केला पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांचे नागरकित्व रद्द करून त्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे. असे वक्तव्य करून नवनीत राणा यांनी दंगे भडकवण्या प्रयत्न केला, असा आरोप असल्पसंख्याक आयोगाने केला आहे.
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषदेत राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान म्हणाले कि नवनीत राणा यांनी अल्पवयीन मुलींची माहिती उघड केली आहे. यामुळे त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. परतवाडा प्रकरणात ज्या आठ अल्पवयीन मुली पीडित आहे, त्यातील एक नागपूरची, तीन अमरावती व चार परतवाडा येथील मुली आहे. सर्व मुस्लीम समाजाच्या मुली आहेत. परतवाडा प्रकरणात नवनीत राणा विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करत असून जनतेची दिशाभूल करत आहेत, असे राज्य अल्पसंख्याक आयोगाने म्हटले आहे.
अल्पसंख्यांक आयोगाच्या टीमने त्या भागाचा दौरा केला. तिथल्या पोलीस अधीक्षकांनी बरीच माहिती दिली. त्यामध्ये मुस्लीम समाजाच्या ८ मुली पीडित असल्याच्या आढळल्या आहेत. १८० हिंदू मुली वगैरे या सगळ्या अफवा होत्या. दंगा भडकवण्यासाठी असं केलं जात असावं. तिथले पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असंही प्यारे खान म्हणाले.
मानव सुगंधे हा अयानला फ्लॅट उपलब्ध करून देत होता. दोन मुलींचे विडिओ आहेत, इतर सहा मुलींचे मात्र केवळ फोटो आहेत. मला नागपुरात बसून कळतं की तिथे हिंदू मुली नाहीत, मग तुम्ही खोटं का बोलताय? आरोपीविरोधात पॉक्सोअंतर्गत कारवाई केलीच जाईल. नवनीत राणा या शहरात दंगे भडकवण्याचं काम करत आहेत. असा आरोप राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नवनीत राणा यांच्यावर केला आहे.





