शाळकरी मुलीवर ८ महिन्यांपासून अत्याचार केल्याचा प्रकार उघड; आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

SHARE:

बीड – जिल्ह्यात शाळकरी मुलीवर ८  महिन्यांपासून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर या प्रकरणात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात शाळकरी मुलीचे वडील सालगडी म्हणून काम करतात. एका शाळकरी मुलीला धमकी देऊन सतत ८ महिने एका आरोपीने अत्याचार केल्याची घटना बीड जिल्ह्यातील केजमधुन उघडकीस आली आहे. शाळकरी मुलगी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. तिचे वडील एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करतात. बीड जिल्ह्यामध्ये महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

बीड जिल्ह्यामधून ही संतापजनक आणि घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर मागील ८ महिन्यांपासून एका आरोपीने सतत अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. लग्नाचे आमिष आणि वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन हा आरोपी १४ वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करत होता. या प्रकरणाने बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. पीडित शाळकरी मुलीच्या तक्रारीनंतर बीड जिल्ह्यामधील केज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात एका आरोपीने शाळकरी मुलीला धमकावून 8 महिने अत्याचार केला आहे, आणि पीडित शाळकरी मुलीला धमकी देऊन दहशतखाली ठेवल्याचा आरोप पीडित मुलींकडून करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित शाळकरी मुलगी इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत आहे. तिचे वडील बीड जिल्ह्यामधील एका शेतकर्याकडे सालगडी म्हणून काम करत आहेत. आरोपी राहुल भालशंकर मूळ रा. जिल्हा बुलढाणा येथील आहे. आरोपी सध्या बीड जिल्ह्यातील केजमध्ये राहतो आहे. हा आरोपी केज परिसरात कामाला होता.

ओळखीचा फायदा घेत या आरोपीने १ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास मुलीवर अत्याचार केला होता. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना ठार मारून टाकीन, अशी धमकी पीडित शाळकरी मुलीला त्याने दिली होती. पीडित शाळकरी मुलगी प्रचंड दहशतीखाली राहत होती. या भीतीपोटी तिने हा प्रकार बरेच दिवस कोणालाही सांगितला नाही. ८ महिन्यांपासून आरोपीकडून १४ वर्षीय शाळकरी मुलीवर सतत अत्याचार सुरू होता. आरोपी राहुल भालशंकरने पीडित शाळकरी मुलीच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला आहे. आरापीने गेल्या ८ महिन्यांपासून शाळकरी मुलीवर लैंगिक शोषण केले आहे. कधी लग्नाचे आमिष दाखवून तर कधी भीती घालून त्याने हा अत्याचार केला आहे. १४  एप्रिल २०२६ पर्यंत शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार सुरूच होते. मात्र, वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून पीडि शाळकरी मुलीने आपल्यासोबत घडलेला हा सर्व धक्कादायक प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला आहे, त्यानंतर हा शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून बीड जिल्ह्यातील केज पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे. केजचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या महिला सुरक्षा पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे. पीडित शाळकरी मुलीचे जबाब नोंदवून तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील केज पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याचे माहित पडल्यावर आरोपी राहुल भालशंकर हा फरार झाला आहे.

बीड पोलीस त्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतशिवारात किंवा शहरातील कामाच्या ठिकाणी असणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. आरोपी राहुल भालशंकरला लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी बीड जिल्ह्यातील केज परिसरातील स्थानिक नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे पीडित शाळकरी मुलीचे कुटुंब हादरले आहे. या घटनेमुळे केज परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात अधिक तपास बीड पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा