नाशिक – भोंदूबाबा खरात प्रकरणात आतापर्यत १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर ४० जणांचे जबाब नोंदवले आहेत, या प्रकरणात ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहे. अशोक खरातविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिस हेल्पलाईनवर २३ दिवसांत अनेक कॉल्स आले आहेत. तर भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत. भोंदूबाबा अशोक खरातला पुन्हा कोर्टात हजर करणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
या भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमले आहे. तरी घटनेचे गांभीर्य पाहून महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी स्वतः या तपासाचा रोज पडताळणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आता अनेक महिला पुढे येत आहेत. आता भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महिला पुढे येऊन तक्रार दाखल करत आहेत. सुरुवातीला काही व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेक महिला बदनामीच्या भीतीपोटी तक्रार करण्यासाठी पुढे येत नव्हत्या. मात्र, नाशिक आणि अहिल्यानगर पोलिसांनी महिलांना विश्वासात घेऊन त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन दिल्याने आता महिलांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
यासाठी सुरू करण्यात आलेल्या पोलिस हेल्पलाईनवर दिवसाला ५ ते ६ कॉल येत आहेत. अशोक खरात प्रकरणात गेल्या २३ दिवसांत अनेक महिलांचे फोन आल्याची माहिती उघड झाली आहे. तक्रार करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. फसवणूक आणि विश्वासघातासोबतच भोंदूबाबा अशोक खरातकडून दबाव तंत्राचा वापर केल्याचेही माहिती मिळाली आहे. अशोक खरात प्रकरणात एकुण १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर ४० जणांचे जबाब नोंदवले गेले आहेत. भोंदूबाबा अशोक खरातवर आतापर्यंत विविध कलमांखाली १५ गुन्हे दाखल झाले आहेत.
तर त्यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आहेत. पोलिस हेल्पलाईनवर आलेल्या माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांनी आतापर्यंत ४० जणांचे जबाब साक्षीदार म्हणून नोंदवले आहेत. यामुळे अशोक खरात प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही आक्रमक झाली आहे. भोंदूबाबा अशोक खरातला कडक शिक्षा व्हावी आणि जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी जनजागृती अभियान राबवणार असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख यांनी म्हटले आहे.
भोंदूबाबा अशोक खरातची महिला अत्याचार प्रकरणातील चौथ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी संपत आहे. अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. नाशिक पोलीस आता पाचव्या गुन्ह्यात त्याला अटक करणार आहे. शुक्रवारी ईडी आणि नाशिकच्या एसआयटीच्या पोलिस पथकाने भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयावर संयुक्त धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात अधिक तपास ईडी आणि नाशिक एसआयटीच्या पोलिस पथक करत आहेत.





