पुणे – भाजप विधी शाखेचा अध्यक्ष वकील संजय सावंतला सेक्रेटरीच्या खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. वकील नवरा व सेक्रेटरीच्या अनैतिक संबंधांच्या संशयावरून वकील संजय सावंतच्या बायकोने सेक्रेटरी पुनम मुनचा खून केला आहे. या प्रकरणात पुनम मुन या महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात भरुन संजय सावंत याच्या ऑफिसमध्येच ठेवला होता. पुण्यामधून ही भयानक घटना उघडकीस आली आहे. पुनम दिनेश मुन असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. पुनम मुन या संजय सावंत यांच्या पुण्यातील मुंढवा भागातील कार्यालयात सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या.
मात्र त्यांचे संजय सावंत यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय सावंतची पत्नी स्वाती सावंतला होता. त्यातून सेक्रेटरी पुनम मुन हिच्यासोबत स्वाती सावंतचे वारंवार वाद होत होते. गुरूवारी १६ एप्रिल २०२६ ला संजय सावंतच्या कार्यालयात संजय सावंतची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीने सेक्रेटरी पुनम मुन यांना मारहाण सुरू केली. पुनम मुन यांचे हातपाय दोरीने बांधून त्यांना बॅटने मारहाण करण्यात आली होती. त्यामध्ये पुनम मुन यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुनम मुन यांचा मृतदेह पोत्यात भरुन ते पोते ऑफिसमध्येच लपवून ठेवण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या संजय सावंतची पत्नी स्वाती सावंत यांचा विचार होता. पुनम मुन यांचे पती उद्धव मुन यांनी त्यांची पत्नी घरी न आल्याने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते संजय सावंतच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात एक पोते आढळून आले आहे. ते पोते त्यांनी उघडून पाहिले असता आतमध्ये पुनम मून यांचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुण्यातील भाजप विधी शाखेचा अध्यक्ष वकील संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक करण्यात आली आहे.
पूनम मून गेल्या साडेतीन वर्षांपासून पुण्यातील भाजप विधी शाखेचा अध्यक्ष संजय सावंत याच्या कार्यालयात सहायक सेक्रेटरी म्हणून काम करत होत्या. गुरुवारी १६ एप्रिल २०२६ रोजी त्या नेहमीप्रमाणे ऑफिसला आल्या होत्या. दुपारी सेक्रेटरी पूनम मून यांचे पती दिनेश मून यांनी पत्नीला फोन केला; पण त्यांनी फोन उचलला नाही. रात्री आठ वाजले, तरीही पूनम घरी आल्या नाहीत. त्यामुळे दिनेश मूनने वकील संजय सावंत याच्याशी मोबाइलवर संपर्क साधून पत्नी अद्याप घरी आली नसल्याचे सांगितले होते.
त्या वेळी संजय सावंत याने पूनम मून मैत्रीण किंवा नातेवाइकांच्या घरी गेल्या असाव्यात, असे सांगितले. रात्री ११ वाजता कुटुंबीयांनी पुण्यातील लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुनम मुन यांचे पती उद्धव मुन यांनी त्यांची पत्नी घरी न आल्याने शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वकील संजय सावंतच्या कार्यालयात गेल्यावर पुनम मुन यांचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणात अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.




