मुंबई – एका घटना दुरूस्ती विधेयकावरून केंद्र सरकारचा संसदेत पराभव झाला. यामुळे सर्वच भाजप नेते महिला आरक्षणाचे नाव घेऊन महिला आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. यावरूनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्या म्हणाल्या की महिला आरक्षण विधेयकाचा आणि मतदारसंघ फेररचना काहीच संबंध नाही; हे माहीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचा फक्त खोटं बोलण्याचा अजेंडा अगदी रेटून नेण्याचे काम करत आहेत, अशी घाणाघाती टीका अंजली दमानीया यांनी केली आहे.
केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ फेररचना घटना दुरूस्ती विधेयक सादर केले. जे संसदेत पहिल्यांदाच पारीत होऊ शकले नाही. या विधयेकावरून मोदी सरकारचा पराभव झाला. यामुळे भापज नेत्यांचा तिळपापड झाला. खर तर महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा कायदा आधीच अस्तित्वात आहे, पण सरकार त्यावर अंमलबजावणी करून राहिलेली नाही.
सरकार लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८१६ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि भविष्यात ती ८५० पर्यंत वाढवण्याची शक्यताही वर्तवली होती. पण त्यासोबतच मतदारसंघ फेररचना विषय मार्गी लावला जाणार होता. याला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. ज्यामुळे मतदारसंघ फेररचना घटना दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित होऊ शकले नाही. याचमुद्द्यावरून सरकार आणि भाजप नेते विरोधकांवर आगपाखड करत आहेत.हे विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषद घेऊन विरोधी पक्षांवर टीका करत आहेत.
याच मुद्द्यावरून अंजली दमानीया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचयावर घाणाघाती टीका केली. त्या म्हणाल्या कि फडणवीसांचा खरेपणा संपत चालला आहे. पूर्वी ते तसे नव्हते, पण आता ते फक्त राजकारण करतात. त्या पुढे म्हणाल्या कि महिला आरक्षण विधेयकाचा आणि मतदारसंघ फेररचना काडीमात्र संबंध नाही, हे माहीत असूनही फडणवीस भाजपचा फक्त खोटं बोलण्याचा अजेंडा अगदी रेटून नेण्याचे काम करत आहेत, अशी घाणाघाती टीका दमानीया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे.
एक्सवर केलेल्या दुसऱ्या एका पोस्टमध्ये दमानिया म्हणाल्या की विरोधी पक्ष बँड वाजवून डान्स करावा’, हे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्या भाजपाने महाराष्ट्रात १४९ उमेदवारांमध्ये फक्त १५ महिला उमेदवार निवडणुकीत उभे केले, ते असे डायलॉग मारतात? वाह! महाराष्ट्रात ३९ मंत्र्यांमध्ये केवळ ४ महिला मंत्री आहेत. आता एक काम करा, मंत्रिमंडळ विस्तार करून ३३ टक्के (१३) महिला मंत्री आणा. पूर्ण महाराष्ट्र बँड वाजवून डान्स करेल, असा खोचक टोला दमानियांनी फडणवीसांना लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते कि देशाने आज विरोधकांची नौटंकी पाहिली, त्यांनी नारीशक्तीच्या बाजुने उभं राहण्याची ऐतिहासिक संधी गमावली. नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून त्यांनी नेमकं कोणाच्या हितासाठी काम करतात, हे स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्षाने बँड वाजवून डांस करावा. भारताच्या महिला हे सगळं पाहत आहेत आणि त्या हे विसरणार नाहीत. माझ्या स्तरावरील कोणत्याही नेत्याने माझ्याशी खुली चर्चा करावी. मात्र, ते करणार नाहीत. ते पळून जातात, असे खुले आव्हान फडणवीसांनी विरोधकांना दिले.
त्यांचे हे आव्हान खासदार सुप्रीया सुळे यांनी स्वीकारले. त्या म्हणाल्या कि मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाचा काहीही संबंध नाही. ५४३ सदस्यांमध्ये महिलांना आरक्षण द्या. आम्ही त्याचा विरोध करणार नाही. अनेक देशात सध्या अराजकता माजली आहे, त्यात तुम्ही विधेयक आणले. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत या विषयावर चर्चा करायला मी तयार आहे. त्यांनी जागा आणि वेळ सांगावी, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.





