केईएम रुग्णालयात २७ वर्षीय रुग्णाची आत्महत्या; नागरिकांकडून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी

SHARE:

मुंबई – केईएम रुग्णालयात २७ वर्षीय रुग्णाची आत्महत्या केली आहे, तर नागरिकांकडून रूग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम हॉस्पिटल येथे शुक्रवारी २७ वर्षीय एका रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये २७ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. या घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य समिति अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी महापालिका रुग्णालयाला भेट देऊन कारवाईचे आदेश दिले.

महापालिका रूग्णालय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या प्रकरणात जे कोणी अधिकारी व कर्मचारी दोषी आढळतील किंवा ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट आदेश राज्य प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील सार्वजनिक आरोग्य समिति अध्यक्ष यांनी केईएम रुग्णालयात भेट देऊन त्या दुर्घटना स्थळाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी महापालिका रुग्णालय प्रशासनास कठोर शब्दांत जाब विचारला आहे.

महापालिका रूग्णालयातील रुग्ण आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत कसा गेला? सुरक्षा व्यवस्थेत कुठे त्रुटी राहिल्या?, तसेच रुग्णाच्या कुटुंबीयांवर याचा काय परिणाम झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रूग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित महापालिका रुग्णालय अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. सर्व संबंधितांसोबत चर्चा करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

तसेच, या रूग्णालयातील प्रकरणात संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजही तपासणी सुरू आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासन रुग्णांच्या सुरक्षेबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना काटेकोरपणे राबवण्यात येतील, असे महापालिका सार्वजनिक आरोग्य समिती व राज्य प्रशासनाने म्हटले आहे.

Leave a Comment