नवी दिल्ली – देशातील भाजपा सरकारने इलेक्टोरल बाँडमध्ये भ्रष्टाचार केला आहे व भाजपा देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी आह असा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी भाजपा सरकारवर केला आहे. तर आपच्या राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आपच्या राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. आपचे खासदार राघव चढ्ढा अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी २४ एप्रिल २०२६ रोजी आम आदमी पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे.
त्यांच्यासोबतच हरभजन सिंग, विक्रम सहानी, स्वाती मालीवाल, राजेंद्र गुप्ताही आपला सोडणार असल्याचे चढ्ढा यांनी जाहीर केले. राघव चढ्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता आपच्या भाजपात विलीनीकरणावर महत्वाची माहिती समोर आली आहे. आपच्या राज्यसभेत विलीनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती मिळाली आहे. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत.
आप खासदारांच्या पत्रात ७ सदस्यांची यादी आहे, हे पत्र भाजपकडे प्राप्त झाले आहे. आणि त्याची औपचारिकपणे दखल घेण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया राज्यसभा अध्यक्षांनी देखील मंजूर केली आहे. दहाव्या अनुसूचीच्या तरतुदींनुसार, विलीनीकरणासाठी दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. सध्याच्या प्रकरणात ही अट पूर्ण झाली आहे, त्यामुळे अपात्रतेचा प्रश्न उद्भवत नाही. राज्यसभेत आपचे १० खासदार आहेत. आम आदमी पक्षाने याला नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. आपचे राज्यसभा प्रतोद एन डी गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ते राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्या विरोधात राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र सादर करणार आहेत. या तिन्ही नेत्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे आपचे राज्यसभा प्रतोद या तिन्ही खासदारांविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे.
हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम साहनी आणि राजिंदर गुप्ता यांनी अद्याप भाजपमध्ये सामील झाल्याचे जाहीर केलेले नाही. आम आदमी पार्टीचे संजय सिंह म्हणाले की, देशातील भाजपा सरकारचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ऑपरेशन लोटस हे अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण आहे. पंजाबमधील भगवंत मान यांच्या आप सरकारला रोखण्याचे काम सुरु आहे. पंजाबची सर्वसामान्य जनता भाजपमध्ये जाणाऱ्या खासदारांना माफ करणार नाही, असे आपचे खासदार संजय सिंह म्हणाले आहेत. आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे ७ खासदार फोडून भाजपमध्ये सामील केले आहेत. या ७ खासदारांना पंजाबच्या जनतेने लक्षात ठेवले पाहिजे. या आप सोडून गेलेल्या लोकांना पंजाबची जनता कधी माफ करणार नाही.
पंजाबच्या लोकांनी, सोडून गेलेल्या भाजपा खासदार यांच्यावर विश्वास ठेवला, आणि राज्यसभेत पोहोचवले आहे. आता ते भाजपमध्ये गेले आहेत. संदीप पाठक यांना पंजाबच्या जनतेमुळे राज्यसभेत जाता आले आहे, असे आपचे खासदार संजय सिंह म्हणाले आहेत. देशातील भाजपा सरकारने इलेक्टोरल बाँडमध्ये भ्रष्टाचार केला आहे, व भाजपा पक्ष हा देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष आहे, त्या पार्टीत सामील होत तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असल्याचे सांगत आहात, तुमच्या गोष्टी कोण मान्य करेल? असा प्रश्न आपचे खासदार संजय सिंह यांनी सआप सोडून गेलेल्या आपच्या खासदारांना केला आहे. आपवर आणि पंजाबच्या जनतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे, तर या गद्दारीचं उत्तर पंजाबचे लोक देतील, असे आपचे खासदार संजय सिंह म्हणाले आहे.






