प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केल्यावरच बच्चू कडूंना विधानपरिषदेत पाठवा; शिंदे सेनेच्या नेत्यांची अट

SHARE:

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भात आपल्या पक्षाची ताकद वाढण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवणार आहेत. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि दुसऱ्या जागेसाठी मात्र बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र मात्र बच्चू कडू यांचा पक्ष प्रहार जनशक्ती हा शिवसेनेत विलीन केल्यावरचर त्यांना विधानपरिषदेत पाठवा, अशी अट शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून ठेवली असल्याचे मीडियात वृत्त आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि विदर्भात त्यांचा पक्ष मजबूत करण्यासाठी बच्चू कडू यांना विधानपरिषदेत पाठवण्यासाठी ईच्छूक आहेत. बच्चू कडू यांच्यासारखा लढावू नेता विधान परिषदेत पाठवला तर पक्षाची भूमिका सामान्य लोकांमध्ये पोहोचेल, असे शिंदे यांचे मत आहे. मात्र बच्चू कडू यांना विधान परिषदेवर पाठवायचं असेल, तर त्यांनी त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णपणे शिवसेनेत विलीन करावा, अशी अट शिवसेनेतील काही नेत्यांकडून ठेवली जात असल्याच्या माध्यमांत चर्चा आहे.

बच्चू कडू या दोघांच्या नावाला शिंदे शिवसेनेतील नेत्यांकडून विरोध होऊ लागला आहे. नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असे या नेत्यांचे म्हणणे आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेशी काहीच संबंध नाही. जर शिवसेनेकडून विधान परिषदेची त्यांना उमेदवारी द्यायचीच असेल, तर त्यांनी त्यांची प्रहार जनशक्ती संघटना ही शिवसेनेत विलीन करावी, अशी अट ठेवावी. ही अट मान्य असेल, तरच त्यांना विधान परिषदेला शिवसेनेकडून संधी द्यावी.
यावर दोन्ही बाजूने पुढे कोणतीही चर्चा झाली नसल्याचे कळते. मात्र, नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोन्ही नावांना शिवसेनेतून प्रचंड विरोध असल्याचे कळते. बच्चू कडू यांच्या नावाला विरोध करताना, विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महायुती सरकारविरोधात घेतलेली भूमिका आणि शिवसेना फुटीवर केलेल्या भाष्यांचा संदर्भ दिला जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात बंड केले होते तेव्हा बच्चू कडू यांनी त्यांना साथ दिली होती. त्यावेळी बच्चू कडू यांची मदत शिंदेंसाठी महत्वाची ठरली. त्यावेळी बच्चू कडू यांनी आक्रमक भमिका घेतली होती. जर असा नेता असा नेता जर आपल्या पक्षाकडून विधान परिषदेत गेला तर त्याचा उपयोग होईल तसेच विदर्भात पक्षाला उभारी मिळेल, असा एकनाथ शिंदेंचा अंदाज आहे.

आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे बच्चू कडू यांनी राज्यात त्यांच्या प्रहार जनशक्ती या पक्षाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या एका जागेसाठी ते आपला पक्ष शिवसेनेत विलिन करतील का? असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होणार आहे. जर त्यांनी ही अट मान्य केली, तर विदर्भातील राजकारणात शिवसेनेची ताकद वाढून त्यांच्या पक्षाचे अस्तित्व समाप्त होऊ शकते, अशी भीतीही त्यांना आहे. त्यामुळे बच्चू कडू काय निर्णय घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment