अखेरीस निश्चित? शिंदे गटात तो पक्ष सामील होणार, परंतु… त्या एका मागणीनंतर राजकारणात मोठा हादरा!

SHARE:

मुंबई – माजी मंत्री बच्चूक डू यांना विधानपरिषदेच्या आमदारकीची शिंदे गटाने ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे. आता याच ऑफरबाबत मोठी माहिती समोर येत आहे. बच्चू कडू यांच्या पक्षाने मोठी भूमिका घेतली आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्या-त्या पक्षाकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराचा शोध आणि निवड केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांना थेट विधानपरिषदेची आमदारकी आणि मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. मंत्रिपद घेऊन बच्चू कडू यांनी आपला पक्ष शिंदे गटात विलीन करावा, असाही प्रस्ताव शिंदे यांनी बच्चू कडू यांच्यापुढे ठेवल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता मोठी माहिती समोर आली आहे. बच्चू कडू यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या ऑफरबाबत एक अट समोर ठेवल्याचे सांगितले जात आहे.

बच्चू कडू यांची कार्यकर्त्यांशी चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बच्चू कडू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत एक बैठक झाली होती. या बैठकीत शिंदे यांनी बच्चू कडू यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर दिलेली आहे. सोबतच शिंदे यांनी कडू यांना मंत्रिपदही देण्यात येईल, असा प्रस्वात दिलेला आहे, असे सांगितले जात आहे. याबाबत बच्चू कडू यांनी अद्याप कोणतेही उघड भाष्य केलेले नाही. परंतु बच्चू कडू हे शिंदे गटाच्या ऑफरबाबत आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा आणि सल्लामसलत करत असल्याचे बोलले जात आहे.

तरच पक्ष विलीन करा
सूत्रांच्या माहितीनुसार बच्चू कडू यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यांनी मंत्रिपद दिले जाईल, अशी ऑफर देण्यात आलेल आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी सध्या विधानपरिषदेची आमदारकी घ्यावी. परंतु लगेच पक्षाचे विलिनीकरण करू नये. सहा महिन्यांनी मंत्रिपद मिळाल्यानंतरच प्रहार जनशक्ती पक्षाचे शिंदे गटाच्या शिवसेनेत विलिनीकरण करावे, अशी भूमिका बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांची आहे.

दरम्यान, आम्ही पक्षाचे विलिनीकरण केल्यास आम्हाला मंत्रिपद हवे. तसेच शिवसेना पक्षाचे विदर्भ विभागाचे सूत्र आमच्याकडे हवे, अशी मागणी प्रहार पक्षाने केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment