पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल: मोदी-शहांना समोर करून, पडद्यामागून ‘या’ पाच नेत्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी फिरवला सगळा गेम

SHARE:

पश्चिम बंगाल-  विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होत चाललय. भाजपची एक मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. आधी डाव्यांचा गड, नंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढणं सोपं नव्हतं. पण भाजपने हे साध्य करुन दाखवलय.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा आहेत. त्यातील १८० पेक्षा जास्त जागांवर भाजप आघाडीवर आहे. १०० च्या आसपास जागांवर तृणमुल काँग्रेस आघाडीवर आहे. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानानंतर बहुतांश एक्झिट पोल्सनी जो अंदाज वर्तवला होता, आता तसाच निकाल येताना दिसतोय.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मितेचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय नेहमीच त्यांना मुस्लिम मतदारांची साथ मिळाली. पण भाजपने यावेळी त्यांना चांगलाच झटका दिला. त्यांची हक्काची मत हिसकावून घेतली. भाजपने हे कुठल्या नेत्यांच्या बळावर शक्य केलं, जाणून घ्या त्या बद्दल.

पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे चेहरे प्रचारात आघाडीवर होते. भाजपने या दोन नेत्यांना पुढे केलं. पण पडद्यामागून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संघटनेचं काम चाललेलं. ही जबाबदारी काही नेत्यांवर देण्यात आलेली. त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

सुवेंदू अधिकारी आणि दिलीप घोष या पश्चिम बंगालमधील नेत्यांनी खूप मेहनत केली. पण दुसऱ्या राज्यातून आलेले तीन नेते सुद्धा पडद्यामागून आखणी करण्यात महत्वाची भूमिका बजावत होते. पुढच्या लोकसभेच्या दृष्टीने भाजपसाठी पश्चिम बंगाल जिंकणं खूप महत्वाचं होतं.

पश्चिम बंगालचे भाजप प्रभारी मंगल पांडेय हे एक महत्वाचे नेते आहेत. ज्यांनी भाजपसाठी जमीन तयार केली. भूपेंद्र यादव यांचही मोठं योगदान आहे. संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. त्या शिवाय संघटन महामंत्री सुनील बंसल हे दीर्घकाळापासून बंगालमध्ये तैनात होते. या नेत्यांनी राज्य भाजपमधील अंतर्गत मतभेद मिटवून एक टीम म्हणून लढण्यासाठी सर्वांना तयार केलं. दिल्लीशी समन्वय साधून प्रचाराची अचूक आखणी केली.

Leave a Comment

अधिक वाचा