भाजप आणि बजरंग दलाच्या दबावामुळे जिम बंद करावी लागली; दीपक कुमार यांचा गंभीर आरोप

SHARE:

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांत उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यातील कोटद्वार शहरातील एका मुस्लिम दुकानदाराच्या समर्थनार्थ पुढे आल्यामुळे दीपक कुमार देशभरात चर्चेत आले होते. बजरंग दलाच्या कार्यकर्त्ये पीडित मुस्लीम दुकानदारा त्याच्या दुकानाचे ‘बाबा’ हे नाव बदलण्यास सांगत होते. दीपक कुमार यांनी आरोप केला आहे की भाजप आणि बजरंग दलाशी संबंधित लोक तरुणांना त्यांच्या जिममध्ये येण्यापासून रोखत आहेत. आता ते शहर सोडून नोकरीच्या शोधात जाणार आहेत.

दीपक कुमार यांची कोटद्वारमध्ये ‘हल्क’ नावाची जिम आहे. चार महिन्यांचे भाडे न भरल्यामुळे त्यांच्या घरमालकाने त्यांना अल्टिमेटम दिला असल्याचे ते सांगतात. त्यांना जिममधून बाहेर काढण्यासाठी बाहेरच्या लोकांनी घरमालकावर दबाव टाकला की नाही, हे आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. पीटीआयशी बोलताना दीपक म्हणाले की बजरंग दलाची भीती आणि इतर दबावांमुळे त्यांच्या जिममधील उपस्थिती लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. तो आता जिमचे सामान विकून नोकरीच्या शोधात शहर सोडून जाण्याचा विचार करत आहे.

गेल्या 26 जानेवारी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी कोटद्वारमधील बाबा स्कूल ड्रेस अँड मॅचिंग सेंटर नावाच्या दुकानात आले आणि आणि दुकानाच्या नावातून बाबा हा शब्द काढून टाकण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. 70 वर्षीय वकील अहमद यांचे हे दुकान आहे. यानंतर दीपक कुमार मुस्लिम दुकानदाराच्या समर्थनात पुढे आले आणि एकटचे भीडले.

जेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला त्याची ओळख विचारली, तेव्हा दीपकने उत्तर दिले की त्याचे नाव मोहम्मद दीपक आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तो म्हणाला होता कि मी हिंदू, मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन नाही. सर्वात आधी मी एक माणूस आहे. 26 जानेवारीच्या घटनेपासून हा मुद्दा सुरू होता, पण 31 जानेवारी रोजी परिस्थिती अचानक चिघळली. देहरादूनहून सुमारे 150 बजरंग दलाचे कार्यकर्ते कोटद्वारमध्ये आले आणि थेट त्यांच्या जिममध्ये जाऊन गोंधळ घातला. यादरम्यान त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही शिवीगाळ करण्यात आली. लोकांनी रस्ता अडवला आणि घोषणाबाजी केली. या घटनांच्या संदर्भात पोलिसांनी तीन स्वतंत्र एफआयआर नोंदवले आहेत.

कोटद्वारमध्ये एका मुस्लिम दुकानदाराचे रक्षण करण्यासाठी बजरंग दलाच्या सदस्यांशी संघर्ष करून द्वेषाविरोधात आवाज उठवल्याबद्दल दंगलीच्या आरोपाचा सामना करत असलेल्या दीपकने सुरक्षेची मागणी करणारी याचिका दाखल केल्यावर उत्तराखंड हायकोर्टाने त्यालाच फटकारले होते.
दीपकने सांगितले की त्याच्या जिममध्ये सध्या 60 ते 65 सदस्य आहेत आणि ही संख्या जिमचा खर्च भागवण्यासाठी पुरेशी नाही. तो म्हणाला कि जिमच्या जागेचे मासिक भाडे 40 हजार रुपये आहे. दीपकने आरोप केला की भाजप आणि बजरंग दलाचे सदस्य जिमच्या ग्राहकांना लक्ष्य करत आहेत. हे लोक भाजपशी संबंधित पालक असलेल्या जिम सदस्यांच्या घरी जातात आणि त्यांना जिममध्ये येण्यापासून रोखतात. यामुळे माझ्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment