नाशिक – स्टॉक मार्केटींगमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली एका व्यक्तीची 60 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.पोलिसांकडून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये स्टॉक मार्केटींगमध्ये जास्त फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 60 लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात फसवणुक करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा 2 च्या पथकाने रायगड जिल्हयातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2023 ते नोव्हेंबर 2025 या काळात हा सर्व प्रकार घडला आहे.
फिर्यादी व त्यांचे मित्र यांना फ्युचर स्टॉक मार्केट एनलिसेस नावाची इनव्हेस्टमेंट फर्म असल्याचे सांगितले. यातील आरोपी यश जानवलकर, युवराज जानवलकर यांनी फिर्यादी व त्यांचे साथीदार यांना पैसे गुंतवणुक करण्यास सांगितले. त्यांच्याकडून 60 लाख रूपयांची रक्कम घेतली आहे. आणि नंतर कोणताही फायदा मिळवून दिला नाही. त्यांची फसवणूक केली आहे. याकारणामूळे फिर्यादी यांनी नाशिकमधील अंबड पोलिस ठाण्यात 18 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्हयातील आरोपींचा गुन्हेशाखा युनिट 2 चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे शोध घेत होते. तांत्रिक व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी रायगड येथे असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हेशाखा युनिट 2 चे अधिकारी व अंमलदार हे आरोपीला अटक करण्यासाठी रायगडला गेले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, सुनिल खैरनार या सर्व पोलिस पथकाने रायगड जिल्हयात जावुन आरोपींचा शोध घेतला आहे.
आरोपी युवराज जाणवलकर हा खोपोली व दुसरा आरोपी यश जाणवलकर हा नेरूळ या परिसरात आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने खोपोली व नेरूळ परिसरात आरोपीना अटक केली. दोघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना नाशिक येथे आणुन पुढील कारवाई केली आहे. व अंबड पोलिस ठाण्यात आरोपींना हजर करण्यात आले आहे. याप्रकरणात अधिक तपास नाशिक पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






