अंबाजोगाई – महाविद्यालयीन तरुणीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर 2 तरुणांनी वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आली आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील महाविद्यालयीनतरुणीला अत्याचाराचे फोटो व व्हिडिओ कुटुंबीयांना आणि सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन पीडित मुलीकडूनकडून 3 लाख रुपये रोख आणि साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने लुटल्याचा प्रकार उघड झाला आहे.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाई येथे राहत आहे. याच काळात तिची ओळख महेश करपे रा. धारूर आणि पवन कराड रा. पांगरी, ता. परळी या दोन तरुणांशी झाली होती. दोघेही तिचा सतत पाठलाग करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनेच्या दिवशी महेश करपे याने तरुणीला जबरदस्तीने मंच्युरियन खाऊ घातले.
त्यामध्ये गुंगीचे औषध मिसळले असल्याने काही वेळातच तरुणी बेशुद्ध झाली. या अवस्थेत महेशने तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर पवन कराड यानेही तिला औषध देऊन पुणे येथील एका लॉजवर नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला आहे. 2 आरोपींनी अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ काढून ठेवले. हे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची तसेच नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत त्यांनी पीडित मुलीचा मानसिक व आर्थिक छळ केला. याचा गैरफायदा घेत वेळोवेळी पीडित मुलीकडून 3 लाख रुपये रोख आणि साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने घेतल्याची माहिती उघडकीस आली आहे.
सातत्याने सुरू असलेल्या मानसिक छळाला व अत्याचाराला कंटाळून पीडित तरुणीने अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. व दोन्ही आरोपींच्या विरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे अंबाजोगाई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आणि आरोपी महेश करपे व पवन कराड या दोन आरोपींना अटक केली. या घटनेबाबत अंबाजोगाईतील स्थानिक नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबाजोगाई पोलिस करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






