भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील आठ जून एक सुवर्णदिन…

SHARE:

बाबासाहेबांचा सतत अभ्यास ।
ग्रंथ वाचनाचा एक निजध्यास ॥
गुणवंत ज्ञानवंत शास्त्राभ्यास ।
कोलंबियात ज्ञानाचा प्रकाश ॥
      विश्वरत्न – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक आणि बौद्धिक प्रवासात आठ जून या तारखेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचा खजिना आहेत,गुणवंत आहेत,ज्ञानवंत आहेत,प्रज्ञावंत आहेत, संविधानाचे शिल्पकार आहेत, गौतमाची वाणी आहे,फुलेंची बंधुता आहे,बुद्धाची नम्रता आहे,शाहूंची समता आहे, समतेची मैत्री आहे,शोषितांची माय आहे, विद्येची वारी आहे, प्रज्ञेचा प्रकाश आहे, क्रांतीची मशाल आहे आणि या क्रांतीच्या मशालीलाच म्हणजे विश्वरत्न – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आठ जून १९२७ रोजी अमेरिकेतील प्रतिष्ठित कोलंबिया विद्यापीठाने (Columbia University) अधिकृतपणे ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (Ph.D.) ही सर्वोच्च पदवी बहाल केली होती.या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व अनमोल आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा प्रसिद्ध प्रबंध ‘द इव्होल्युशन ऑफ प्रॉव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया’ (The Evolution of Provincial Finance in British India) हा कोलंबिया विद्यापीठाला सादर केला होता.हा प्रबंध  त्यांनी सन – १९१७ मध्येच पूर्ण केला होता,मात्र काही तांत्रिक प्रक्रिया आणि प्रकाशनानंतर दि.८ जून १९२७ रोजी त्यांना ही डॉक्टरेट पदवी अधिकृतपणे प्रदान करण्यात आली. यामुळे जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल झाले.
         प्रचंड बुद्धिची । गरुड भरारी । 
        विद्येची ती वारी । परदेशी ॥
          त्या काळात परदेशात जाऊन,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अशा नामांकित विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय ठरले.
         पहिले पीएचडी । पदवी धारक ॥ 
        भीमराव एक । डॉक्टरेट ॥
           तत्कालीन अस्पृश्यता आणि सामाजिक विषमतेच्या भिंती तोडून बाबासाहेबांनी मिळविलेले हे यश जगभरातील शोषित आणि वंचितांसाठी एक मोठी प्रेरणा बनले. ‘डॉक्टर’ ही उपाधी याच दिवशी मिळालेल्या पदवीमुळे त्यांच्या नावापुढे ‘डॉक्टर’ (Dr.) ही उपाधी कायमची जोडली गेली,जी आज संपूर्ण विश्वात अत्यंत आदराने घेतली जाते.आठ जून हा दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अथांग ज्ञानसाधनेची,प्रचंड बुद्धिच्या गरुड भरारीची, जागतिक बौद्धिक क्षमतेची,प्रज्ञेच्या प्रकाशाची, प्रज्ञावंत त्यागी ज्ञानवंताची मोहोर अधिकृतपणे उमटवणारा एक महान सूवर्णदिन आहे. विश्वरत्न – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक बौद्धिक क्षमतेला,प्रचंड बुद्धिच्या गरुड भरारीला माझा सलाम ॥
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय
साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
(टीप – वरील लेख हा जुन्या तारखेचा जरी असला तरी वाचकांच्या अभ्यासात भर पडावा करिता प्रकाशित.)
विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment