तिवसा (अमरावती) : स्थानिक श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या श्री राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गरजू, अभ्यासू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.हा शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मा. सौ. आरतीताई रा. वानखडे, मा. श्री. अनिलभाऊ थुल व छायाताई दंडाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते पार पडला.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. गुणवंतांचे कौतुक आणि मान्यवरांचा सत्कारयाच कार्यक्रमाचे औचित्य साधून नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल मानसी दीपक सहारे हिचा श्री रामदासपंत देशमुख व सौ. लताताई रा. देशमुख यांच्याकडून ५,००० रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. तसेच, महाराष्ट्र शासनाचा मानाचा ‘वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार’ मिळाल्याबद्दल श्री हेमंत दादा निखाडे आणि अखिल भारतीय ग्रामीण तिवसा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री. प्रशिक शापामोहन यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

वाचनालयाला नेहमीच सहकार्य करणाऱ्या श्री रामदासपंत देशमुख यांचाही त्यांच्या पत्नीसह (सपत्नीक) शाल देऊन कृतज्ञता सत्कार करण्यात आला.दानशूर दात्यांचे आर्थिक सहकार्यहा सेवाभावी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे माजी विद्यार्थी व सद्या शासकीय सेवेत कार्यरत असलेले अक्षय गडलिंग, रोशन राऊत, पंकज इंगळे तसेच वाचनालायचे सभासद अंकुशभाऊ देशमुख, प्रफुल बनसोड, बाळा देशमुख, मंगल ठाकूर, विक्रांत इंगळे, दीपक धानोरकर, स्वप्नील कुऱ्हेकर, पंकज कळमकर, सुनीलभाऊ बहाद्दरपुरे, अंकुश गायकवाड, राहुल धडांगे व राजाभाऊ देशमुख यांनी मोलाचे आर्थिक सहकार्य केले.या सोहळ्याला सुधाकरराव सहारे,मयूर वानखडे, संजयभाऊ वाट, मधुकरराव पिंगळे, सुमित अनासाने, गोपालभाऊ फरकाडे, सुनीलभाऊ घोरमाडे, सतीश नंदनवार, कृणाल गौरखेडे, हृषीकेश गंधे, सचिन काळे, प्रिया डहाके, मोनिका येवले यांच्यासह गावातील अनेक नागरिक आणि वाचनालयाचे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन अक्षय गडलिंग यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कु. अलोणे यांनी मानले.
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.






