“श्रीयान बाळ”
श्रीयानचा वाढदिवस पहिलाअकरा ऑगस्टला॥
आनंद झाला मनोमनी देऊळकर कुटुंबाला ॥
प्रेमळ आजी प्रभाबाईचा आशीर्वाद तुला ॥
आई रिनाताई पिता भूषणचा आशीष तुला ॥
श्रुती बहीण थोरली श्रीयानचे लाड करिते ॥
श्रेणा बहीण धाकटी पप्पी घेऊन हसविते ॥
घर तुमचे आनंदाने उजळून निघाले ॥
पाऊल श्रीयानचे तुमच्या घरात पडले ॥
हसणे बाळाचे जणू अमृताची धार ॥
श्रीयानच्या येण्याने आयुष्याला आधार ॥
रांगता रांगता पूर्ण वर्ष कधी संपले ॥
इवल्या पायाने चालताना नाही कळले ॥
श्रीयानच्या इवल्या हातांचा स्पर्श पावन ॥
आनंदाने भरून जाते सर्वांचेच मन ॥
आज पूर्ण झाले श्रीयानला एक वर्ष छान ॥
तूच आहेस तयांच्या जगण्याचा अभिमान ॥
पहिल्या वाढदिवसाच्या श्रीयानला शुभेच्छा॥
आनंदाने मोठा हो हीच मनस्वी सदिच्छा ॥
शुभेच्छुक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
काँग्रेस नगर, अमरावती .
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






