शासनाचे डोके ठिकाणावर आहे का..?

SHARE:

दिल्लीत जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद देशाबरोबर जगभर पडलेले दिसून येत आहे. हुकूमशाहीचं सरकार आल्याचं भयावह चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. याला जबाबदार कोण?

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, हे तत्वज्ञान देशात तार्किक होतांना दिसत आहे. लोकशाही मध्ये प्रश्न शासनाला प्रश्न विचारणे हे जनतेचे कर्तव्य आणि त्याचे उत्तर देणे हे शासनाचे. मात्र, माझ्या देशात प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाते. त्याला धमकवल्या जाते.

शांततापूर्ण सुरू असलेल्या आंदोलन स्थळी नेमप्लेट नसलेले पोलीस घुसवून मुलांवर लाठीहल्ला केला जातो. शासनाविरोधी आवाज उठवला तर त्याला देशद्रोही घोषित केलं जातं, अशी एकंदरीत परिस्थिती देशाची झाली आहे. अशी देशाची परिस्थिती कोणी केली असेल त्याला सुद्धा लाज वाटत नसेल का?

13 एप्रिल 1919 मध्ये जनरल डायरने भारतीयांवर अमानुषपणे गोळीबार करण्याचा आदेश दिला होता, मात्र आता आपल्या देशातील काळ्या इंग्रजाने आंदोलन स्थळी जमलेल्या लोकांवर दगड फेक करण्याचा इशारा तर दिला नाही हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. लोकशाही ला एकंदरीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे का? हे पाहायला सुद्धा लोकांना वेळ नाही. गेल्या दशकात 150 पेक्षा जास्त पेपर लिक होण्याच्या घटना समाज माध्यमावर पाहायला मिळत आहे. त्याबद्दल कठोर कायदे शासनाने बनवले आहे मात्र, अंमलबजावणी आहे तरी कुठे…
मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारं सरकार विद्यार्थ्यांना न्याय देईल का? की केवळ धार्मिक बाबींमध्ये च लोकांना गुंतून ठेवणार हा ही मोठा प्रश्न….

ब्रिटिशांनी राज्य केलं तेव्हा आपले प्रामाणिक वृत्तपत्र प्रामाणिक बातम्या सामान्यांपर्यंत पोहोचवत असत, मात्र आता प्रामाणिक मीडिया सुद्धा विकली गेली असेल का?
लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. मात्र तसं आता कुठं आपल्या निदर्शनास आहे का?
इतिहासाची पुनरावृत्ती होती, हे आम्हाला इतिहासाने शिकवलं. म्हणूनच हिटलरने 30 एप्रिल 1945 रोजी स्वतःच जीवन संपवलं असेल का?

2022 मध्ये आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी श्रीलंकेत आक्रमक झालेले जेन झी आज आपल्या देशात दिसत आहे. याचे कारण काय असावे?

देश हा सार्वभौम असतांना व्यापार करताना अमेरिकेचे वर्चस्व देशावर कसे काय?

एकीकडे मुलगी वाचवा अशा योजना असतांना तिकडे 16 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतांना शासन कुठं गेले?
भारताला तरुणांचा देश म्हटल्या जाते, तरी सुद्धा तरुणांवरच अन्याय का?

अण्णाभाऊ साठे, सांगून गेली तशीच व्यवस्था या देशाची दिसत आहे. ही न्यायव्यवस्था काहिकांची रखेल झाली,
ही संसद देखील हिजड्याची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे,
इथली व्यवस्था भ्रष्टातेने रंगीन झाली.
या परिस्थितिला एकंदरीत जबाबदार कोण? जितके राज्यकर्ते तितकीच जनता सुद्धा. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. जनतेवर होणाऱ्या अत्याचारविरुद्ध जनता आवाज उठवणार आणि शासन त्याला उत्तर देणारच हे सुद्धा तितकंचं सत्य.

आम्ही भारताचे नागरिक आहोत, सरकारचे गुलाम नाहीत हे सुद्धा शासनाने लक्षात घ्यायला पाहिजे आणि सरकार म्हणजे भारत नाही. स्वतःला आमचा राजा समजण्याचे धाडस शासनाने करू नये. आम्ही तुमची प्रजा नाही देशाचे नागरिक आहोत. आम्ही भारत मातेवर प्रेम करतो आणि ते सुद्धा तुमच्या पेक्षा जास्तचं.

लेखक –
तन्मय ग.पुनसे
पळसखेड, जि.अमरावती
संपर्क – ७४९८९०८२३६

तन्मय गणेश पुनसे
Author: तन्मय गणेश पुनसे

लेखक एक उत्कृष्ट व्याख्याते, लेखक, विद्रोहीकवी, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थी असून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड या गावी ते राहतात. अंधश्रद्धा, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, भयकथा, शेतकऱ्यांच्या व्यथा इत्यादी विषयांवर लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे. जेष्ट साहित्यिक प्रा. हरी नरके कथा पुरस्कार 2024 व अमरावती जिल्ह्याचा कविवर्य नारायण सुर्वे काव्यलेखन पुरस्कार 2026 ने ते सन्मानित आहे. मागील गेल्या वर्षभरापासून विविध समाज माध्यमांद्वारे आपले लिखाण करून आपले विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत.

Leave a Comment