अमरावती – मराठी साहित्याच्या विविध साहित्यप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी, गुणवंत साहित्यिकांच्या सर्जनशीलतेचा सन्मान करण्यासाठी बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या वतीने “राज्यस्तरीय बांधिलकी मराठी साहित्य पुरस्कार –२०२७” साठी जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
राज्यातील साहित्यिकांनी दि. १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या आपल्या साहित्यकृती पुरस्कारासाठी पाठवाव्यात.
पुरस्काराचे स्वरूप
प्रत्येक राज्यस्तरीय पुरस्कारासाठी :
₹११००/- रोख रक्कम
सन्मानपत्र
सन्मानचिन्ह
शाल
राज्यस्तरीय पुरस्कार –
१. बांधिलकी कादंबरी पुरस्कार
प्रायोजक – वृषाली वानखडे
२. बांधिलकी बालसाहित्य पुरस्कार
प्रायोजक – श्री. प्रफुल्ल ठाकरे
३. बांधिलकी कथासंग्रह पुरस्कार
प्रायोजक – श्री. शंकर घोरसे
४. बांधिलकी कवितासंग्रह पुरस्कार( वऱ्हाडी , गझल सर्व कवितेचे प्रकार )
प्रायोजक – श्री. दिवाकर देशमुख
५. बांधिलकी समीक्षासंग्रह पुरस्कार
प्रायोजक – सौ. स्मिताताई बूल
६. बांधिलकी ललित लेखसंग्रह पुरस्कार
प्रायोजक – शालिनी बेलसरे
जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कार –
जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी विविध साहित्यप्रकारांतील एकूण १० उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करण्यात येईल.
यासाठी सर्व साहित्यप्रकारांतील प्रकाशित साहित्यकृती मागविण्यात येत आहेत.
पुरस्काराचे स्वरूप :
सन्मानचिन्ह
सन्मानपत्र
शाल
प्रायोजक :
मंदा नांदूरकर
छाया राऊत बर्वे
शारदा बरडे
साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख –
दि. २० नोव्हेंबर २०२६
दि. १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींच्या दोन प्रती पाठवाव्यात.
साहित्यकृतीसोबत लेखकाचा अलीकडील फोटो व अल्पपरिचय पाठविणे आवश्यक आहे.
साहित्य पाठविण्याचा पत्ता –
ॲड. नीता प्रफुल्ल कचवे
नंदनवन कॉलनी, अमरावती
पोस्ट – व्ही.एम.व्ही. – ४४४६०४
ता. व जि. अमरावती, महाराष्ट्र
संपर्क : ८८०५२५८०१६
पुरस्कार नियमावली –
१) पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविताना संबंधित साहित्यकृतीच्या दोन प्रती, लेखकाचा फोटो व अल्पपरिचय सोबत पाठवावा.
२) साहित्यकृती दि. २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत आयोजकांकडे प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या साहित्यकृती पुरस्कारासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
३) पुरस्कारासाठी पाठविण्यात येणारी साहित्यकृती दि. १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेली असावी.
पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविताना साहित्यकृतिना आय. एस. बी. एन. क्रमांक असणे बंधनकारक आहे.
४) परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहील. त्याबाबत कोणताही आक्षेप अथवा पुनर्विचार केला जाणार नाही.
५) पुरस्काराचा निकाल वृत्तपत्रे व विविध समाजमाध्यमांद्वारे जाहीर करण्यात येईल. तसेच सर्व विजेत्यांना वैयक्तिकरित्या कळविण्यात येईल.
६) पुरस्कार वितरण सोहळा बांधिलकी प्रतिष्ठानच्या आगामी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होईल.
७) विजेत्या साहित्यिकांची पुरस्कार वितरण सोहळ्यास स्वतःची उपस्थिती अनिवार्य राहील. प्रतिनिधीच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार नाही. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर पुरस्कार पोस्टाने पाठविला जाणार नाही.
८) विजेत्या साहित्यिकांना संस्थेमार्फत कोणत्याही प्रकारचा प्रवासखर्च अथवा निवासखर्च देण्यात येणार नाही.
९) पुरस्कारासंदर्भातील नियोजन, आयोजन व इतर आवश्यक निर्णय घेण्याचे सर्व अधिकार संयोजन समितीकडे राखीव राहतील.
१०) पुरस्कारासाठी पाठविलेल्या साहित्यकृती कोणत्याही कारणास्तव परत पाठविल्या जाणार नाहीत.
११) पुरस्कारसाठी पाठविलेली साहित्यकृती ही त्या त्या साहित्याची प्रथमावृत्ती असणे बंधनकारक आहे.
विशेष सूचना –
पुरस्कारासाठी साहित्य कृतीची निवड झाल्यास आपणास तसे निवड पत्राद्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. याबाबतीत कुणीही संस्थेकडे वारंवार विचारणा करु नये..
पुरस्कारासंदर्भात कोणतीही अडचण अथवा अधिक माहिती साठी संपर्क साधावा.
संयोजिका –
ॲड. नीता प्रफुल्ल कचवे
संस्थापक – बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती.
संपर्क – ८८०५२५८०१६
Author: ॲड. नीता प्रफुल कचवे
लेखिका माजी जिल्हा परिषद शिक्षिका (स्वेच्छा निवृत्त) असून एक उत्कृष्ट साहित्यिक अधिवक्ता, समुपदेशक व वक्ता म्हणून कार्यरत आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान व बांधिलकी बहुउद्देशीय ट्रस्ट अमरावती च्या संस्थापक अध्यक्षा म्हणून सामाजिक क्षेत्रात कार्य करतात. समाजात वाचनालय, बालसंस्कार केंद्र, महिला व युवतींसाठी विविध उपक्रमे, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन कार्यशाळा, शाळा व कॉलेज मधे विविध विषयांवर व्याख्यान हे त्यांचे प्रमुख कार्य आहेत. बांधिलकी प्रतिष्ठान, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठी साहित्य मंडळ, भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, अखिल भारतीय कुर्मी मराठा समाज संघटना, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी ३० पुस्तकांचे प्रस्तावना लेखन केलेले आहे. तीन पुस्तकांचे संपादन केलेले आहे. कथा, कविता व लेखन सारख्या विषयांवर कार्यशाळा घेणे, राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले आहे. त्यांनी स्वतः १० पुस्तकांचे प्रकाशन केले असून ५ पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार २०२५, राष्ट्रीय नारिशक्ती पुरस्कार २०२६ दिल्ली, शब्दवेल नारिशक्ती सन्मान २०२६, खरी कारभारीण नारिशक्ती पुरस्कार २०२६, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले काव्यप्रतिभा पुरस्कार २०२६ च्या त्या मानकरी ठरल्या आहेत. समाज जागृती हा त्यांचा आवडीचा छंद राहिला असून, सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून आपले विचार ते नेहमी वाचकांसाठी मांडत असतात.





