‘बैलपोळा’ हा सण बळीराजाच्या जिवाभावाचे सोबती, म्हणजे बैलं अर्थात बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. आज दि. १० सप्टेंबर २०२६ ला असलेल्या ‘बैलपोळा’ या सणानिमित्त साहित्यिक व कवी प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांची कविता येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.
बैलपोळा
बैलांच्या कौतुकाचा हा दिन उगवला ॥
बळीराजाचा बैलपोळा आला रे आला ॥
राबती वर्षभर घाम घाळुनी आपला ।
भरपूर पिकता शेतकरी सुखावला ॥
बैलांच्या कष्टाने हिरवेगार शिवार ।
कृषकांच्या जीवनात आनंदाच वारं ॥
जुंपायचे नाही आज सण बैल पोळा ।
मंदिरासमोर झाले सर्वंच बैलं गोळा ॥
शेतकऱ्यांचा हा आनंदाचा सण आहे ।
रंगीत मखमली झुली पाठीवर आहे ॥
शिंगांना बेगड रंगीबेरंगी लावती ।
बैलपोळ्याला नादमधुर गीत गाती ॥
बैलांच्या गळ्यात घुंगुरमाळेचा साज ।
बैलपोळ्यातच तया आनंदाचे राज ॥
देखणे रूप बैलांचे सुंदर दिसते ॥
बघून रूप शेतकरी आनंदात न्हाते ॥
बैलांमुळे बघा होई बळीराजा सुखी ॥
निसर्गा करू नको रे तयांना तू दु:खी ॥
बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ॥
बळीराजा सुखी राहो मनस्वी सदिच्छा ॥
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
समता गौरव पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व कवी, अमरावती.
संपर्क : ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






