‘बैलपोळा’ निमित्य साहित्यिक व प्रसिद्ध विद्रोही कवी श्री. संजय अण्णाजी देशमुख यांची विद्रोही कविता येथे वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत…
बैलपोळा
पोळा रे पोळा बैलांचा पोळा,
झाले बेईमान हो…एका जागी गोळा,
बेरोजगारी, महागाईनं मारला डोळा
जीवानं मारलाय हो… शेतकरी भोळा,
घरात विदेशी माल अन् पैसाही काळा
जनतेस म्हणतो हो… स्वदेशी पाळा,
सरकारी कामासाठी धरला गुरूजीचा नाडा
भंगार केल्या हो… सरकारी शाळा,
इडी सिबीआयचा लावला घोडा
विरोधकांच्या तोंडांत कोंबला बोळा,
एक नमन गौरा पार्वती हर हर महादेव…
लेखक –
संजय अण्णाजी देशमुख
साहित्यिक व कवी,
मु. पळसखेड, जि. अमरावती.
संपर्क – ९४२१७८९००९
Author: संजय अण्णाजी देशमुख
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..






