चित्य चैतन्या पडता मिठी l दिसे हरीरूप अवघी सृष्टी ll

SHARE:

संत तुकारामांची सगुण उपासना…

संत तुकाराम महाराज सगुण मूर्तीची पूजा करत होते. त्यांची महापूजा म्हणजे व्यापक सर्वेश्वराच्या ठिकाणी देव पाहणे. हीच त्यांची पूजा होय. सर्वश्वराच्या पूजनाचे वर्म त्यांनी जाणले होते. आपण चांगले कर्म करावे. हीच खरी देवाची पूजा असे ते मानत. हेच गीतेच्या अठराव्या अध्यायात सुद्धा सांगितले आहे. संत तुकारामही तेचसांगतात.

“स्वामीकाज गुरुभक्ती l
पितृ वचन सेवापती ll
हेचि विष्णूची महापूजा l
आन भाव नाही दुजा ll”

संसारातील कर्तव्यापासून माणसाने पळून न जाता सर्व कर्तव्ये उत्कृष्टपणे पार पाडावी. यावरून असे दिसते की तुकारामांनी पलायनवादाला थारा न देता  प्रयत्नवादाला महत्व दिलेले आहे. तुकारामांनी हनुमान, गणेश, राम, कृष्ण, शिव, विष्णू, दत्त, इ. दैवतांच्या भक्तीला प्राधान्य दिले आहे आणि या दैवताना मान्यता असल्याने “मिळाले वारकरी चतुष्टय” असेही म्हटले आहे.

1. “हनुमंत महाबळी l रावणाची दाढी जाळी ll

2. जाले रामराज्य काय उणे आम्हासी ll

3. रामनाम म्हणा उघड मंत्र एक”

4. गौळणीया गळा बंधिती धरणी l पाया चक्रपाणी लगे तया ll      

वारकरी पंथाचे अंतिम साध्य ब्रह्म साक्षात्कार करून घेणे. हे आहे आणि संत तुकाराम महाराज सगुण मूर्तीची पूजा करत होते. त्यांची महापूजा म्हणजे व्यापक सर्वेश्वराच्या ठिकाणी देव पाहणे. हीच त्यांची पूजा होय. सर्वश्वराच्या पूजनाचे वर्म त्यांनी जाणले होते. आपण चांगले कर्म करावे. हीच खरी देवाची पूजा असे ते मानत. हेच गीतेच्या अठराव्या अध्यायात सुद्धा सांगितले आहे. संत तुकारामही तेच सांगतात.

“स्वामीकाज गुरुभक्ती l
पितृ वचन सेवापती ll
हेचि विष्णूची महापूजा l
आन भाव नाही दुजा ll”

संसारातील कर्तव्यापासून माणसाने पळून न जाता सर्व कर्तव्ये उत्कृष्टपणे पार पाडावी. यावरून असे दिसते की तुकारामांनी पलायनवादाला थारा न देता प्रयत्नवादाला महत्व दिलेले आहे. तुकारामांनी हनुमान, गणेश, राम, कृष्ण, शिव, विष्णू, दत्त, इ. दैवतांच्या भक्तीला प्राधान्य दिले आहे आणि या दैवताना मान्यता असल्याने “मिळाले वारकरी चतुष्टय” असेही म्हटले आहे. ब्रह्म साक्षात्कार करून घेणे आणि हे अंतिम साध्य अनेक संतांच्या बाबतीत कसोटीला उतरले आहे. “अव्यक्ता, अलक्षा, अपारा अनंता l निर्गुणा सच्चित्ता नारायणा ll” असे निर्गुण परमेश्वराविषयी देखील अनेक अभंगातून तुकारामांनी उद्गार काढले आहेत.

“ठाकलासे द्वारी l
उभा याचक भिकारी l
मज भीक काही देवा l
प्रेम भातुकें पाठवा ll”

सर्वात्म रूप परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यानंतरही तुकोबांनी भावपूर्ण अंतःकरणाने पांडुरंगाच्या सगुण स्वरूपाची एकनिष्ठपणे प्रेमभक्ती केली आणि या ज्ञानोत्तर सगुण प्रेम भक्तीचा आजन्म प्रचारही केला. यावरून तरी असे दिसते की, भक्ती करताना तुकारामांनी  परमेश्वराच्या निर्गुण रूपापेक्षा  सगुण रूपावरच भर दिला. ह्या अचिंत्य, अव्यक्त, एकमेवाद्वितीय स्वरूपाची कल्पना सामान्य व्यक्तीच्या कल्पनेबाहेरची असते. सामान्य माणसाला चालता बोलता, इंद्रियगोचर, सगुण परमेश्वर हवा असतो. असा सगुण परमेश्वर जो आपले इप्सित पुरवील, आपल्या प्रेमाची भूक भागविल,आपल्या नेत्रादी इंद्रियांना सुख देईल, असा सगुण, दयाळू, प्रेमाचा पुतळा, प्राप्त व्हावा ही त्याची इच्छा असते. म्हणून साधारण व्यक्ती राम, कृष्ण, विष्णू, शिव, भवानी, चंडी आदी सगुण रूपाची भक्तिभावाने पूजा करतो.

“चित्य चैतन्या पडता मिठी l
दिसे हरिनाम अवघी सृष्टी ll”

आत्मोंन्नतीसाठी सगुण भक्तीला प्राधान्य दिले जाते. संत तुकाराम मूर्तिपूजक होते. त्यांनी यावज्जीवन पांडुरंगाची उपासना केली.

“अवघ्या दशा येणेंचि साधती l
मुख्य उपासना  सगुण भक्ती ll”

संत तुकाराम महाराज म्हणतात की, सगुणाची उपासना म्हणजेच ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधनातील प्रमुख साधन आहे. त्यामुळे परमेश्वर भक्ताचा शुद्ध भाव जाणून त्याला दर्शन देतो. हरिनाम हे साधन म्हणजे बीज आहे. तसेच साध्यही आहे म्हणजे फळ ही ते आहे.

लेखिका –
डॉ. शोभा माधव गायकवाड
राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित,
संत साहित्याचे अभ्यासक, अमरावती.
संपर्क – ९४२३२७९४३२

डॉ. शोभा माधव गायकवाड
Author: डॉ. शोभा माधव गायकवाड

लेखिका या एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, संत साहित्याच्या अभ्यासक, कवी, अभंगकार, समाजप्रबोधनकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यांनी ग्राहक पंचायत, अंधश्रद्धा निर्मूलन, जेष्ट नागरिक मंडळ अश्या विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात योगदान दिले आहे तसेच विविध पुरोगामी संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत. त्यांनी M.A., B.Ed., M.Ed., M.Phil., D.S.M., B.J., SET, Post Graduate In Yoga Therapy, P.hd., ग्रामगिताचार्य अश्या विविध विषयांची उपलब्धी प्राप्त केली आहे. त्यांचे असंख्य पुस्तकांचे वाचन असून स्वतः 30 पुस्तकांचे लिखाण करून प्रकाशित केलेले आहे. 2024 साली एकाच दिवशी 10 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावे आहे. 2010 साली त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'उत्कृष्ट शिक्षक' म्हणून राष्ट्रपती च्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच बरोबर विविध पुरस्कारांच्या सुद्धा त्या मानकरी आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून त्या सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक अश्या विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार त्या जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा