पदवीधर निवडणूक रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवर मतमोजणीच्या दिवशीच नागपूर खंडपीठात सुनावणी; ८४०० दुबार मतदार, डिप्लोमा व डिफार्म यादीत सामील

SHARE:

नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीतील कथित अनियमिततेविरोधात प्रा. सचिन शंकरराव काळबांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींसमोर सुनावणीनंतर हे प्रकरण पुन्हा नागपूर खंडपीठात वर्ग करण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिली. उद्या, मंगळवार दि. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणीच्या दिवशी या याचिकेवर तातडीने सुनावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याचिकेतील प्रमुख मुद्दे :

प्रलंबित अर्ज : नागपूर विभागातील ९८ हजार ७८२ अर्ज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत प्रलंबित असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

पारदर्शकतेवर प्रश्न : अंतिम मतदार यादी, अर्जांची छाननी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

अनियमितता : ८४०० मतदान दुबार नोंदणी झालेली आहे, तसेच डिप्लोमा व डिफार्म मान्यता नसताना यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

विरोधाभासी उत्तरे : अंतिम यादी डिसेंबर २०२५ मध्ये प्रकाशित करण्यात आली असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला, तसा ऑर्डरमध्ये नमूद करण्यात आला आहे. दुसरीकडे, रचना इंदूरकर निवडणूक अधिकारी या सांगतात की, अंतिम यादी नेमकी कधी प्रकाशित होईल हे सांगता येत नाही, काम सुरू आहे असे १० ऑक्टोबरला सांगतात. त्यामुळे खरे कोण बोलत आहे आणि खोटे कोण, हा प्रश्न निर्माण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

न्याय न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रा. सचिन काळबांडे

सदर निवडणूक ही बोगस मतदार यादीवर झालेली आहे म्हणून ही निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार, असा इशारा प्रा. सचिन काळबांडे यांनी दिला आहे. आता नागपूर खंडपीठाच्या मतमोजणीच्या दिवशीच असलेल्या सुनावणीकडे पदवीधर मतदार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा