केशवनगर सांस्कृतिक सभा द्वारा संचालित सरस्वती शिशु मंदिर रेशीमबागच्या विद्यार्थ्यांकडून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इतिहासाचा जागर…

SHARE:

नागपूर : आमदार सांस्कृतिक महोत्सव समिती च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शिवकालीन किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आ. प्रविण दटके यांच्या मार्गदर्शनाखाली व संयोजक सौं. निरजा पाटील यांच्या नेतृत्वात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर शहरात तीन गटात विभागलेल्या या स्पर्धे मधे मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून आज दि. 3 नोव्हेंबर पासून किल्यांचे परीक्षण सुरु करण्यात आले आहे. 

याच धर्तीवर सरस्वती शिशु मंदिर, केशवनगर, रेशीमबाग येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६६४ मध्ये मालवणच्या समुद्रात बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व आहे. किल्ल्याची भक्कम तटबंदी, भव्य प्रवेशद्वार, शिवराजेश्वर मंदिर आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना यांची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि स्वराज्याच्या संरक्षणासाठी केलेले कार्य समजले. ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरला.

या उपक्रमात अन्वी उईके, निर्मला टिपले, लोमेश्वरी लहरे, परिधी घाटे, प्रियांश मिरे, श्रेयस दुबे, ऋषि कैकाडे, रुद्र चिलगिरीवार, ऋतुराज भाटी, ईशान कनेरे आणि प्रणिका शिमले या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या उपक्रमासाठी शिक्षिका अनुराधा तारे, पद्मश्री माहूरकर, कीर्ती अढाऊ, वंशिका आंबटकर आणि अनुराधा वाणी यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तृप्ती परतवार यांनी या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा