बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा तिढा, दोन जागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

SHARE:

बारामती : बारामती नगर परिषदेची निवडणूक ही सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ८  उमेदवारांना बिनविरोध विजय मिळाला. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तिथे निवडणुकीसाठी कुठलंही आव्हान नसल्यामुळे अजित पवारांच्या पक्षाच्या ८  नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी धक्कादायक दावा केला. उमेदवारी अर्ज घेण्यासाठी समोरच्या पार्टीकडून २०  कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर आता बारामची विधान परिषदेच्या निवडणुकीत आणखी एक मोठा तिढा निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे.

बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये यंदा मोठा तिढा निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्देशांमुळे दोन प्रभागांतील निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र, नगराध्यक्ष पदासह उर्वरित सर्व जागांच्या निवडणुका पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार होणार आहेत.

‘या’ प्रभागांमध्ये निवडणूक तात्पुरती स्थगिती

प्रभाग क्रमांक १३  (ब) व प्रभाग क्रमांक १७ (अ) या दोन जागांसाठी निवडणूक आयोगाकडून सुधारित आदेश आल्यानंतरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर २६  नोव्हेंबर रोजी नव्याने दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांच्या स्वीकृतीवर तांत्रिक बाबी वरून अर्ज नामंजूर करण्यात आले होते मात्र यानंतर भाजपचे ते सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेऊन यावर याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने सुनावणीनंतर हे अर्ज स्वीकारण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले.

भाजप नेते सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड यांच्या अर्जांवर आधी हरकती उठवून ते नामंजूर करण्यात आले होते. दोघांनीही न्यायालयात धाव घेतली आणि नामनिर्देशन सादर करतानाचा सीसीटीव्ही फुटेज आवश्यक पुरावे सादर केले. न्यायालयाने ‘नैसर्गिक न्याय’ तत्त्वानुसार दोन्ही अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यानुसार फाळके आणि गायकवाड यांनी काल नव्याने उमेदवारी दाखल केली.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रतीक्षा

नव्या अर्जांची छाननी, अर्ज माघारी प्रक्रिया आणि अंतिम मान्यता या सर्व बाबींवर राज्य निवडणूक आयोगाचे सुधारित आदेश आवश्यक असल्याचे निवडणूक अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी स्पष्ट केले. त्यानुसार नगराध्यक्ष पद आणि बाकी सर्व प्रभागांची निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसारच होतील. फक्त दोन जागांची निवडणूक राज्य आयोगाचा पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित राहील.

Leave a Comment

अधिक वाचा