लग्नानंतर देवदर्शनाला जाताना सोलापुरात नवदाम्पत्याचा भीषण अपघात, कारचा चुराडा, पाच जणांचा जागीच मृत्यू…

SHARE:

सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरी गावात कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. लग्नानंतर प्रथमच देवदर्शनासाठी तुळजापूरला निघालेल्या नवदाम्पत्याच्या गाडीला अपघातात झाला. या भीषण अपघातात पाच जणांना जागीच प्राण गमवावे लागले, तर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. जखमींना बार्शी येथील जगदाळे मामा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच माजी आमदार राजेंद्र राऊत हॉस्पिटलमध्ये जखमींची विचारपूस करण्यासाठी दाखल झाले होते.

कार आणि ट्रकची समोरासमोर धडक
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी गावात रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. पांगरी गावाजवळील जांभळबेट पुलावर मालट्रक आणि कारचा समोरासमोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

पाच जणांचा जागीच मृत्यू
पांगरी गावाजवळ झालेल्या अपघातात गौतम कांबळे, जया कांबळे, संजय वाघमारे, सारिका वाघमारे यांच्यासह आणखी एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण बार्शी तालुक्यात पसरली. माजी आमदार राजेंद्र राऊत व त्यांच्या समर्थकांनी ताबडतोब बार्शी येथील जगदाळे मामा खाजगी रुग्णालयात जाऊन जखमी व नातेवाईकांची विचारपूस केली.

नवदाम्पत्य जखमी; चार दिवसांपूर्वी लग्न

अनिकेत गौतम कांबळे आणि मेघना अनिकेत कांबळे या दोघांचे चार दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. नवविवाहित तरुण-तरुणी दोघे ही गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, जखमी नवविवाहित दम्पत्यला बार्शीत खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करणायत आले आहे.

मेघना आणि अनिकेतच्या विवाहानंतर देवदर्शन

मेघना आणि अनिकेत यांचा२६  नोव्हेंबर रोजी विवाह झाला होता. या नवदाम्पत्याला घेऊन कुटुंबीय देवदर्शनसाठी तुळजापूरला निघाले होते. मात्र अचानक कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे. यामध्ये कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा