
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज १० डिसेंबर २०२५ , आजचा वार बुधवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज सगळीकडे धडाडी दाखवाल आणि लोकांना मनाप्रमाणे वागवून घ्याल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज कोणत्या वेळी काय करायला पाहिजे याची जाण येईल, पाहिजे तिथे बोलण्यामुळे कामावर परिणाम होऊन काम लवकर होईल.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज अंगात असलेल्या कौशल्याला प्रयत्नांची जोड दिल्यास यश तुमचेच आहे.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज कामामुळे आज अजिबात विश्रांती मिळणार नाही, महिलांनी संघर्ष टाळावेत.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज आर्थिक नियोजन करण्यात तुमचा हात कोणी पकडणार नाही, दूरच्या प्रवासाचे योग येतील.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांनो आज आज थोडे अस्वस्थ राहाल, गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीप्रमाणे वागून चालणार नाही.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज परदेशातले व्यवहार सुरळीत होतील, तेथे छोटी ट्रिप करावीशी वाटेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कलाकार, खेळाडू प्रसिद्धीच्या झोतात येतील, घरामध्ये पूर्वी ठरलेला एखादा शुभ समारंभ पार पडेल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज व्यवसायातील काम नेहमीप्रमाणे चालू राहून, त्यात येणारे तांत्रिक अडथळे दूर होतील, महिलांना पाहुणचार करावा लागेल.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या सतत बदलणारा मूड आजूबाजूचे वातावरण आनंदी करू शकणार नाही, नोकरीनिमित्त परदेशी जाण्याचे योग्य येतील.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील, खूप दिवसांनी एक वेगळाच उत्साह मनात संचारेल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्या उत्तम कल्पनाशक्तीचा उपयोग तुमच्या जवळच्या लोकांना होईल, तुमचे कर्तृत्व उठून दिसेल.





