‘खरी माणूसकी फक्त भारतीयांकडेच आहे’, विदेशी महिला झाली भावुक, हॉटेल स्टाफनं मध्यरात्री औषधं दिली आणून…

SHARE:

गुजरात – अतिथी देवो भव ही संकल्पना भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. आपल्याकडे पाहुण्यांची देवाप्रमाणे सेवा केली जाते. मग ते घर असो वा हॉटेल. आणि याचीच प्रचिती देणारं एक प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. रिझॉर्टमध्ये थांबलेल्या एका विदेशी पर्यटक महिलेची तब्येत अचानक बिघडली. त्यावेळी रिझॉर्टमधील कर्मचारी मध्यरात्री तिच्या मदतीसाठी धावून गेले. त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला आणि औषधं आणून दिली. या महिलेने हा संपूर्ण अनुभव एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केला आहे. ती म्हणतेय, अशी माणुसकी फक्त भारतीय लोकच दाखवू शकतात.

व्हायरल व्हिडीओमध्ये झळकणाऱ्या महिलेचं नाव तान्या संगानी असं आहे. ही महिला गुजरातमधील मधुबन रिझॉर्ट अँड स्पामध्ये थांबली होती. एका रात्री अचानक तिची तब्येत बिघडली. परिणामी तिनं रूम सर्व्हिसला फोन करून मदत मागितली. लक्षवेधी बाब म्हणजे मध्यरात्री रिझॉर्टमधील कर्मचारी तिच्या मदतीला धावून गेले. कोणतीही तक्रार न करता डॉक्टरांनी सांगितलेली औषधं तात्काळ आणून तिला दिली. सध्या महिलेची तब्येत स्थिर आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी तिच्यासाठी केलेली ही धावपळ पाहून ती खूपच भावुक झाली. त्यांचं कौतुक करणारा व्हिडीओ तिनं शेअर केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ thevergeindia या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओमध्ये महिला म्हणतेय, “भारतीय लोक खूप चांगले आहेत. इतकी माणुसकी फक्त भारतीय लोकच दाखवू शकतात.” हा व्हिडीओ पाहून नेटकरी खुश झाले असून, माणूसकी हीच भारताची खरी ओळख असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा