‘तो सीन करताना आम्ही…’ ‘सैराट’ सिनेमातील आकाश ठोसरसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल काय म्हणाली रिंकू…

SHARE:

मुंबई – मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूला ‘सैराट’ या सिनेमामुळे प्रसिद्धी मिळाली आणि ती रातोरात प्रसिद्ध झाली. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या सिनेमानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेलं. हा सिनेमा अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. ‘सैराट’ सिनेमावर आधारित बॉलिवूडमध्ये ‘धडक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पातळीवर ‘सैराट’ या सिनेमाला सन्मान मिळाला. या सिनेमाचे शूटिंगचे काही व्हिडिओसुद्धा शेअर करण्यात आले होते. ‘सैराट’ मध्ये रिंकू आणि आकाश ठोसरचे इंटिमेट सीन होते. अशातच नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान रिंकूनं इंटिमेट सीनबद्दल भाष्य केलं आहे.

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरला आजही आर्ची आणि परशा म्हणून ओळखलं जातं. ‘सैराट’ मधे रिंकू आणि आकाशचा कारमध्ये इंटिमेट सीन होता. ‘आरपार’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रिंकूने या सीनवर भाष्य केलं आहे. मुलाखतीदरम्यान रिंकूला, ‘सैराट सिनेमात तुझा गाडीतला इंटिमेट सीन होता. तुला भीती नाही वाटली? ह्या सगळ्याला आपण तयार आहोत का? पुढे करायचंय का? ह्याचे परिणाम काय होतील?’ असा प्रश्न विचारला. यावर रिंकू म्हणाली की, ‘हा सीन ज्यावेळेस मी ऐकला तेव्हा मी घाबरले होते. पण तेव्हा नागराज दादा मला म्हणलेले, ‘अगं, दिसतं तसं करताना दिसत नाही.’ तो सीन करताना आम्ही हसत होतो. कॅमेऱ्याची मूव्हमेंट असते. हा सीन करताना आम्ही फालतूच्या गप्पा मारत होतो. कोणत्याही कारणावरून आम्ही दोघेही हसत होतो. त्यामुळे मला हा सीन करताना कोणतीही भीती वाटली नाही’, ‘त्याआधी आम्ही सगळे ४ महिने एकत्र राहिलो होतो. त्यामुळे आमच्यात मैत्री झाली होती. आमच्यात कम्फर्ट झोन तयार झाला होता.’ असं रिंकूनं पुढे सांगितलं.

दरम्यान, रिंकू राजगुरूच्या कामाबद्दल सांगायचं तर सध्या ‘आशा’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिंकूच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. हा सिनेमा १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर अभिनेत्री लवकरच ‘पुन्हा साडे माडे’ या सिनेमामध्ये झळकणार आहे.

Leave a Comment

अधिक वाचा