
राशींभविष्य – वैदिक पंचांगानुसार, आज २९ डिसेंबर२०२५, आजचा वार सोमवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
आज कुठेही अव्यवहारी वागून चालणार नाही आजचे सोडून पळत्याच्या मागे धावलात तर हाती काही पडणार नाही.
वृषभ रास (Taurus)
तुम्हाला पुष्कळ काही करायचं असेल परंतु शक्ती पैसा आणि परिस्थिती या सर्व गोष्टींचा विचार करून पावले उचला.
मिथुन रास (Gemini)
तरुणांना प्रेमात पडण्यासाठी संधी चालून येतील योग्य जोडीदार मिळण्यासाठी प्रयत्न कराल.
कर्क रास (Cancer)
आज कुठेही निर्णय प्रत येऊ शकणार नाही महिलांना म्हणावी अशी भाग्याची साथ मिळणार नाही.
सिंह रास (Leo)
तुमचे ध्येय आणि योजना चांगले असल्या तरी अव्यवहारी असल्यामुळे प्रत्यक्षात उतरू शकणार नाही.
कन्या रास (Virgo)
आज तुम्हाला तुमच्या मनासारखे दान पडणार आहे अंगात धडाडी संचारेल.
तूळ रास (Libra)
कोणालाही न जुमानता कामाला लागाल वैवाहिक जीवन रुळावर येईल एकमेकांना समजून घ्या.
वृश्चिक रास (Scorpio)
थोडी अस्थिर आणि चंचल मनोवृत्ती राहील प्रकृतीला सांभाळावे लागेल.
धनु रास (Sagittarius)
रोगप्रतिकारक शक्ती थोडी कमी पडेल कामाच्या ठिकाणी गिऱ्हाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा.
मकर रास (Capricorn)
नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे गोंधळात पडल्यासारखे वाटेल.
कुंभ रास (Aquarius)
आज बडबड जास्त आणि काम कमी झाल्यामुळे स्वतःच्याच प्रगतीला खीळ घालाल.
मीन रास (Pisces)
प्रेमवीरांना आपल्या भावना व्यक्त करायला योग्य जोडीदार भेटल्यामुळे उत्साह संचारेल.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





