आम्हा ओबीसींचा धर्म कोणता, गौरवदादा किटुकले यांचा ब्राह्मणवादी व्यवस्थेला खडा सवाल…

SHARE:

अमरावती – सन १८५५  मध्ये जोतीराव फुले यांच्या शाळेतील 4 वर्गाची विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांनी ‘आमचा धर्म कोणता? असा सवाल केला होता. यानंतर आता ओबीसी देखिल सवाल करू लागले आहेत. ब्राम्हण ओबीसींना हिंदू मानत आहेत. मात्र ओबीसी म्हणत आहेत कि आम्ही हिंदू नाहीत. आम्हाला धर्म नाही. दरम्यान आम्हा ओबीसींचा धर्म कोणता? असा खडा सवाल गौरवदादा किटुकले यांनी ब्राह्मणवादी व्यवस्थेला केला आहे. त्यांच्या प्रश्नाने खळबळ माजली आहे.

गौरवदादा किटुकले पुढे म्हणाले कि धम्म परिषद काय असते, यापासून आम्ही ओबीसी खूप दूर आहोत. धम्मच नाही माहित तर परिषदेचा विषय स्पष्ट होतो. ओबीसी सांगतो कि धम्म परिषद काय आहे, हे माहित नाही. परंतू सन २०१४  पासून मेश्राम साहेबांसोबत चळवळीत काम करत असताना आम्हाला समजलं कि या देशामध्ये आम्हाला धर्म नाही. आम्हा ओबीसींना असा कुठलाही धर्म नाही. धर्म तर सोडा आम्हाला हक्क आणि अधिकार देखिल नाही.

जे अधिकार बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिले होते ते हक्क अधिकार सुद्धा हिरावून घेतले आहेत.आता आमच्यासाठी काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. जर आम्हाला धर्म असता वर्तमानामध्ये छत्रपती संभाजी राजेंच्या पत्नी आहेत, त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला. त्यांना मंदिरात आरती करू दिली नाही. मग असा प्रश्न निर्माण होतो कि आमचा कोणता धर्म आहे, असा प्रश्न त्यांनी ब्राह्मणवादी व्यवस्थेला विचारला आहे.

गौरवदादा किटुकले म्हणाले कि इथले जे मनुवादी ब्राह्मण आहेत, ते आम्हाला हिंदू म्हणून नाचवत आहेत. आणि आम्हीही नाईलाजास्तव हिंदू धर्म डोक्यावर घेऊन फिरत असतो. खरोखरचं हिंदू धर्म आमचा असता तर आम्हाला अधिकार असते. आम्हाला समानता असती, आम्हाला न्याय असता, पण यामध्ये आमचं स्थान कुठे आहे, हे तुम्हाला माहित आहे.

या विचार मंचावर आम्हाला बसवलं आणि बोलण्याची संधी दिली. मात्र ब्राह्मणांच्या व्यासपीठावर आम्हाला स्थान नसंत. आमचा विचारमंच असतो तर त्यांचं व्यासपीठ असतं. त्यांच्या व्यासपीठावर आम्हाला प्रश्न करता येत नाहीत. त्यांनी जे सांगितलं तेच ऐकाव लागतं, जर असं असेल तर खरोखरचं तो आमचा धर्म असू शकतो का, असा टोलाही त्यांनी ब्राह्मणवादी व्यवस्थेला लगावला.
गौरवदादा किटुकले म्हणाले कि बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा या संघटने काम करत असताना बुद्धिष्ठ इंटनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या कार्यक्रमात आम्हाला बोलावंल आणि बोलण्याची संधी दिली. या विचारमंचावर जसे आम्ही स्पष्टपणे बोलतो तसे इतर कुठल्याही ठिकाणी बोलता येत नाही. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडतो कि नेमका आमचा धर्म कोणता?

तथागत गौतम बुद्धांनी जगाला जो धम्म दिला. ज्यातून अनेक देशांनी क्रांती केली आणि बुद्धाच्या विचारांनी चीन आणि जपानसारखे देश आर्थिक महासत्ता झाले आहेत. कारण बुद्धाच्या विचारात, समता, स्वातंत्र, बंधूता आणि न्याय हे तत्व आहे. मग ओबीसींनी विचार करायला पाहिजे कि आपला धर्म कोणता? त्यांनी ठरवलं पाहिजे कि कोणत्या धर्माचा प्रचार-प्रसार करायचा आणि कोणत्या धर्माच्या प्रचारासाठी गेलं पाहिजे.
ते आम्हाला सांगतात कि तलवारीच्या बळावर धर्म बदलला गेला. पण ही चुकीची गोष्ट आहे. तलवारीच्या पात्यावर धर्म बदलला जात नाही. धर्म परिवर्तन हे विचाराने होते. जगात कुठेच तलवारीच्या पात्यावर धर्म बदलला गेला नाही. १९५६  मध्ये बाबासाहेबांनी आपल्या लोकांना बौद्ध धम्म दिला. जेव्हापासून एससी लोकांनी हा धम्म स्वीकारला तेव्हापासून ते आझाद आहेत. परंतू १९५६ पासून आजही आमचा ओबीसी गुलामीत जगत आहे. आम्हाला आमचा धम्म कोणता माहित नाही. जर आम्हाला आमचा धम्म माहित नसेल तर अशा धम्म परिषदा लावणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी ओबीसी समुदायाला केले.

Leave a Comment

अधिक वाचा