पुणे – पुण्यामध्ये प्रचारात, शिंदेगट शिवसेना शहराध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख, नाना भानगिरे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात शिवसेनेच्या प्रचारादरम्यान गोंधळ झाला आहे, तर पुण्यातील शिवसेना शहराध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक केल्यामूळे एक उमेदवार जखमी झाला आहे.
राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामूळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात पुण्यात राजकीय वातावरण तापले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच, हडपसर परिसरातील काळेपडळ येथे प्रचार सुरू असतानाच दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, पुणे शहरप्रमुख यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना झाडली आहे. या घटनेत भानगिरे यांच्या कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. असून, यामध्ये महिला उमेदवार सारिका पवार या जखमी झाल्या आहेत.
काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नाना भानगिरे, आणि प्रभाग क्रमांक ४१ च्या उमेदवार सारिका पवार या आपल्या कार्यकर्त्यांसह, हडपसरमधील काळेपडळ भागातील मयूर जेएमएनएस सोसायटी परिसरात, मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आणि प्रचारासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक काहींनी, त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या घटनेत भानगिरे यांच्या कारची काच फुटली, तर एक दगड लागल्याने उमेदवार सारिका पवार यांच्या हाताला दुखापत झाली आहे. सीसीटीव्ही कॅमे़र्यांची तपासणी सुरू आहे.
या घटनेबाबतची माहिती काळेपडळ पोलीस ठाण्याला देण्यात आली, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले जात असून, हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
नाना भानगिरे यांनी याप्रकरणी बोलताना म्हटले आहे की, निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे भ्याड हल्ला करणे चुकीचे आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया, रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे परिसरात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. प्रभाग क्रमांक ४१ मध्ये प्रचार करत असताना, काही हल्लेखोरांनी गाडीवर हल्ला केला. शहराध्यक्ष नाना भानगिरे हे देखील प्रचाराला गेले असताना, त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.





