पुणे – पुण्यात जमीन गैरव्यवहार प्रकरणात, पुन्हा चौकशी होणार आहे, तर अमेडिया कंपनीनेच आपल्याकडून हा दस्त नोंदवून घेतल्याचा, वकील तृप्ता ठाकूरांनी आरोप केला आहे. अमेडिया कंपनीनेच पार्थ पवार पोलीस चौकशीच्या फेऱ्यात येणार आहेत.
राज्यातील मनपा निवडणुका तोंडावर असताना सध्या राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोपांची सत्र पाहायला मिळत आहेत. त्यातच पुणे भूखंड गैरव्यवहार प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले आहे. दस्त नोंदवून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणात काय कडक कारवाई होणार? कारवाईला वेळ लागणार की, त्यास नवे वळण मिळणार हे आता पाहायला मिळणार आहे.
मनपा निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने, सर्वच राजकीय पक्षांनी झोकून देत काम करण्यात सुरुवात केली. एकत्र असणाऱ्या पक्षांची युती तुटली, तर कुठे कल्पनाही नसेल अशी युती झाली. राज्यात एकिकडे फक्त आणि फक्त राजकीय घडामोडींचीच चर्चा असताना, पुन्हा एकदा एका मोठ्या पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणाने सामान्यांचे लक्ष वेधले आहे.
पुणे जमीन गैरव्यवहारप्रकरणानं पुन्हा डोके वर काढले आहे, कारण पुण्यातील मुंढवा इथे जमीन गैरव्यवहार प्रकरणी जेडिआर संतोष हिंगणे यांचाही जबाब पुणे पोलिसांनी नोंदवला असून, आता तपास यंत्रणांकडून शीतल तेजवानीच्या वकिल तृप्ता ठाकूर यांनी जाहिर केलेल्या चॅटचीही चौकशी करत आहेत. या मध्ये येत्या काळात अजित पवार यांच्या टिममधील प्रशासकीय अधिकार्यांचाही जबाब नोंदवला जाऊ शकतो, अशी माहिती मिळाली असून, तपास अधिकारी दत्ता वाघमारे हे मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा अधिक तपास करत आहेत.
याप्रकरणी तेजवानीच्या वकील तृप्ता ठाकूर यांनी बावधन पोलिसांना दिलेल्या जबाबात अमेडिया कंपनीनेच आपल्याकडून हा दस्त नोंदवून घेतल्याचा आरोप केला होता. ज्यामुळे आतातरी पुणे पोलिसांकडून पार्थ पवारांची चौकशी केली जाणार का? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. निवडणुकीच्या धामधुमीतच या प्रकरणी सुरू असणाऱ्या तपासातून नवी माहिती समोर आल्याने , आता ही कारवाई वेग घेते की त्यास नवे वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुण्यातील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी, आरोपी शीतल तेजवानी सध्या पोलीस कोठडीत असून ती या प्रकरणात मुख्य सूत्रधार गणली जात आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीवरुन, शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली आहे.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण ५ नोव्हेंबर २०२५ ला उघड केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ माजली होती. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं नाव असणारी कागदपत्रही समोर आल्याने, त्यातील इतरही अनेक धागेदोरे आता बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. आता पार्थ पवार यांची पुन्हा चौकशी होते का नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





