बलात्कार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या काँग्रेस आमदार ला पोलिसांनी केली अटक

SHARE:

केरळ – केरळमधील पलक्कड येथील काँग्रेस आमदार राहुल ममकुटाथिल यांना रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांना रात्री साडेबाराच्या सुमारास एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. पठाणमथिट्टा येथील एका महिलेने त्यांच्यावर तिसऱ्या बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. तक्रारदार सध्या कॅनडामध्ये काम करत आहे. पोलिसांच्या अनुसार, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रार मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली.

पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की तपास केवळ पुराव्याच्या आधारे आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे केला जात आहे. राहुल ममकुटाथिल यांना न्यायालयात हजर केले जाईल. या प्रकरणात कोणताही दबाव सहन केला जाणार नाही आणि सर्व पैलूंची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. माहित असावे कि आमदार राहूल ममकुटाथील यांच्याविरोधात यापूर्वी दोन तक्रारी दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून काढून टाकले.

तिसऱ्या तक्रारीत, महिलेने राहुल ममकुटाथिल यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनुसार, तिने जबरदस्तीने लैंगिक शोषण, गर्भपात आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने पोलिसांना सांगितले की ती गर्भवती असून गर्भाची डीएनए चाचणी करण्याची तयारी करत होती. लॅबने नमुना मागितला, परंतु राहुल ममकुताथिलने सहकार्य केले नाही. महिलेचा दावा आहे की तिच्याकडे आरोपांना समर्थन देणारे पुरावे आहेत.

महिलेने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की ती सोशल मीडियाद्वारे राहुलच्या संपर्कात आली. त्यावेळी तिचे पतीशी मतभेद होते. राहुलने तिच्या पतीशी असलेले नाते संपवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. राहुल ममकुताथिलने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि असेही म्हटले की मूल झाल्यास तिच्या कुटुंबाची मान्यता लवकर मिळेल. तपास यंत्रणा या दाव्यांची चौकशी करत आहेत.

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की राहुल ममकुताथिलने तिला सतत भेटण्याची विनंती केली. जेव्हा तिने सार्वजनिक ठिकाणी भेटण्याचा सल्ला दिला तेव्हा त्याने त्याच्या सार्वजनिक जीवनाचा हवाला देत नकार दिला. त्यानंतर महिलेने आमदाराला पलक्कडमधील एका हॉटेलमध्ये भेटण्याची ऑफर दिली आणि खोली बुक केली. महिलेच्या म्हणण्यानुसार, आम्ही हॉटेलच्या खोलीत पोहोचताच आरोपीने माझ्यावर जबरदस्ती केली.

Leave a Comment

अधिक वाचा