बेंगलोर-कोल्हापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात; कोल्हापूर अँटी करप्शनच्या वैष्णवी पाटील जखमी

SHARE:

कर्नाटक – बेंगलोर-कोल्हापूर महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे, या घटनेत कोल्हापूर अँटी करप्शनच्या वैष्णवी पाटील जखमी झाल्या आहेत. कोल्हापूर अँटी करप्शनच्या वैष्णवी पाटलांच्या कारचा मोठा भीषण अपघात झाला आहे. तर या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालेला आहे. कोल्हापूर अँटी करप्शनच्या वैष्णवी पाटील जखमी पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. चित्रदुर्गमध्ये उपचार सुरु आहे. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे हा अपघात झाला. वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका लॉरीला जाऊन धडकली.

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरो मध्ये, कार्यरत असलेल्या वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला असून वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे हा अपघात झाला. वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका लॉरीला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचे मोठे नुकसान झाले, आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोच्या वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. तर जखमींना त्वरित चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वैष्णवी पाटील यांच्यावर तेथे उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, इनोव्हा आणि लॉरीच्या जोरदार धडकेत हा भीषण प्रकार, घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलासह, अँटी करप्शन ब्युरो वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

अधिक वाचा