किशोरी शहाणे यांच्या वाहनाचा गंभीर अपघात. व्हिडिओद्वारे संताप व्यक्त केला…

SHARE:

मनोरंजन विश्व : मराठी सिनेसृष्टीतून एक भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला आहे. ठाणे – मुंबई मार्गावर अपघात झाला असल्याची माहिती आहे. किशोरी शहाणे शूटिंगनिमित्त प्रवास करत होते. दरम्यान, त्यांच्या चारचाकी वाहनाला एका वाहनानं धडक दिली. सुदैवानं या घटनेत कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. परंतु, त्यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे किशोरी शहाणे यांनी व्हिडिओ पोस्ट करून संताप व्यक्त केला. त्यांनी या अपघाताची माहिती दिली. सध्या किशोरी शहाणे यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?
किशोरी शहाणे यांची आज शूटिंग होती. शूटिंगनिमित्त प्रवास करत असताना ते ठाणे – मुंबई मार्गावरून जात होते. यावेळी एका बेशिस्त वाहनचालकानं त्यांच्या चारचाकी वाहनाला बाजूनं धडक दिली. या धडकेमुळे त्यांच्या चारचाकीचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या चारचाकीचा साईड मिरर तुटला. तसेच चारचाकी दरवाज्याचेही प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, अपघातानंतर वाहनचालक तिथे न थांबता तेथून निघून गेला. याचा तीव्र संताप अभिनेत्रीनं व्यक्त केला.

अभिनेत्रीनं पोस्ट करून व्यक्त केला संताप
अभिनेत्रीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. तसेच अपघाताची माहिती देत संताप व्यक्त केला. त्यांनी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं की, ‘खरंतर प्रत्येकाला पुढे जायची घाई असते. ही घाई मलाही आहे. पण तुम्ही लोक इतके असंवेदनशील कसे असू शकतात? कुणाच्या वाहनाला धडक बसते आहे. यामुळे चारचाकीचं नुकसान होत आहे. याकडे तुमचं लक्ष नसतं. तुम्ही थेट निघून जाता. मला त्या व्यक्तीचा प्रचंड राग येत आहे. अशा घटनांमुळे फक्त पैसा आणि वेळ वाया जात नाही, तर मनस्तापही प्रचंड प्रमाणात होतो”, असं म्हणत किशोरी यांनी संताप व्यक्त केला.

सहकलाकार अन् चाहत्यांकडून विचारपूस

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishori Shahane Vij (@kishorishahane)

किशोरी शहाणे यांनी यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकरी, चाहते आणि सहकलाकारांनी कमेंट करून तब्येतीची विचारपूस केली. तसेच काहींनी संतापही व्यक्त केला. सध्या किशोरी शहाणे यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Leave a Comment

अधिक वाचा

आजचे राशिभविष्य २३ एप्रिल २०२६: कुठल्या संकटांची आणि सुखाच्या दिवशी मध्ये आपल्याला काही समस्या अनुभवायच्या असतील की सुखाचे दिवस दिसणार? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी गुरूवार कसा जाणार? राशिभविष्य पूर्णपणे वाचा.