जळगाव शहरात २ तरुणांमध्ये, झालेल्या वादानंतर गोळीबाराची घटना

SHARE:

जळगाव – जळगाव शहरात काल २ तरुणांमध्ये, झालेल्या वादानंतर गोळीबाराची घटना घडली आहे. जळगावात काल महापालिकांसाठी मतदान सुरू असतानाच जळगावात गोळीबाराची घटना घडली आहे. पोलिसांची फौज दाखल झाली होती. जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये, हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती असून दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर ही गोळीबाराची घटना घडली.

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी काल मतदान झाले असून, आज मतदानाची मतमोजणी होत आहे. मात्र, काल काही महापालिका क्षेत्रात गटातटात आणि उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच, जळगावमध्ये काल गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी माहिती दिली आहे.

जळगाव शहरातील पिंपराळा परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे, काल दोन तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर ही गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर, पोलिसांचा मोठा फौजफाटा पिंप्राळा परिसरात दाखल झाला. जळगावमध्ये गोळीबार नेमका कुठल्या कारणावरून झाला अद्याप स्पष्ट नाही. जळगाव पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिस तपास करत असून असून गोळीबार करणाऱ्या तरुणांचाही शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी, जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माहिती दिली. जळगाव गोळीबारच्या घटनेवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पिंपराळा भागातील रहिवासी असलेले सचिन आणि मुस्तफा नामक तरुणांमध्ये आर्थिक विषयावरून वाद होता. त्यातून गोळीबारची घटना घडलेली आहे. या घटनेचा मतदानाशी काहीही संबंध नाही. असे पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा