राशीभविष्य – आज १९ जानेवारी २०२६, आजचा वार सोमवार आहे. नुकतंच २०२६ वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. भोलेनाथांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज थोडे निसर्गाच्या सानिध्यात गेलात, तसेच तरुणाईमध्ये मिसळला तर खूप उत्साह येईल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रॉपर्टी खरेदी करण्याचे मनात असेल तर त्या दृष्टीने पावले उचलायला हरकत नाही, नवीन वाहन खरेदीचे योग संभवतात.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज जरा जास्तच कष्ट पडतील, सर्वात गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रत्येक गोष्टीचा लाभ उशिरा पदरात पडेल, काहीतरी नवीन योजना राबवायच्या मनात येतील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज प्रयत्नांती परमेश्वर आहे, याचा प्रत्यय येईल, विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल.
कन्या रास (Virgo)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज ‘मौनम सर्वार्थ साधनम’ ही गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या कल्पकतेला दाद द्यावी, अशा तुमच्या कल्पना असतील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याकडे कल राहील, सगळ्यांपेक्षा मला जास्त समजते हा अहंकार निर्माण होऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तुमच्या लहरी आणि विक्षिप्त स्वभावामुळे, कोणाशी फार काळ सख्ख्य राहणे कठीण जाईल.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज अत्यंत स्वतंत्र वृत्ती आणि त्याबरोबर थोडी निर्णय क्षमता ही कमी या दोन गोष्टींमुळे आजूबाजूचे लोक जरा गोंधळातच पडतील.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात काही झाले तरी, जास्त ताण घ्यायचा नाही हे ठरवून टाका.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज प्रकृती बिघडण्याची शक्यता महिलांनी सर्व बाबतीत समतोल राखावा.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज श्रम घेण्याच्या बाबतीत इतरांपेक्षा थोडे कमीच पडाल, काम करण्याच्या ठिकाणाचे वातावरण तुम्हाला अनुकूल राहणार नाही.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





