वाळवा – सांगलीसारख्या पुरोगामी जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या, पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. वाळव्यात करणीचा प्रकार उघड झाला आहे. स्व. राजाराम बापूंच्या प्रतिमेला टाचण्या टोचल्या आहेत, तर लिंबू टाकण्याचा प्रकार अज्ञात व्यक्तीने केला आहे. सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद व स्थानिक नगरपंचायत , पंचात समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील ग्रामीण जादूटोण्याचा वापर वाढला असून त्यातून स्व. राजाराम बापू पाटील यांनाही सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे सांगलीसारख्या पुरोगामी जिल्ह्यात, असा विचित्र प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सांगलीत महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या हालचाली जोरदार सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये सर्व प्रकारचे मार्ग अवलंबले जात असल्याचे दिसत आहे. यामध्ये करणी आणि काळी जादूचा मार्गही अवलंबला जात आहे. परंतु सांगलीमध्ये काही वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. जिवंत नव्हे तर चक्क मयत व्यक्तीच्या फोटोवर विचित्र प्रकारे बदनामी केल्याचे दिसून आले आहे. वाळवा तालुक्यातील येल्लूर येथे स्व. राजाराम बापू पाटील, यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचल्याचे, लिंबू फिरवल्याचे आढळून आले आहे. यामुळे पुरोगामी ओळख असणाऱ्या जिल्ह्याला डाग लागला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्व. राजाराम बापू पाटील हे माजी मंत्री , आमदार जयंत पाटील यांचे वडील आहेत. सांगलीत नुकत्याच महानगरपालिका निवडणुका पार पडल्या आहेत.
येल्लूर येथे स्व. राजाराम बापू पाटील, यांच्या प्रतिमेवर करणी केली आहे. ज्या भागात हा प्रकार घडला त्या भागात, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडीक यांच्या वहिनी हर्षाली राहुल महाडिक, या जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून, उमेदवार उभा राहणार आहे. नुकतेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका केली होती. स्व. राजाराम बापू पाटील यांच्याबाबत, वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे मोठा वाद उत्पन्न झाला होता. आता या नव्या प्रकारामुळे नवा वाद होण्याचे चिन्ह दिसत आहे. मात्र पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या आणि पुरोगामी चळवळीला ताकद देणाऱ्या, सांगली जिल्ह्यात करणीसारखा प्रकार व जादूटोण्याची ही विचित्र घटना घडली आहे. आता राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये ,जिल्हा परिषद निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोध दोन्ही बाजूने जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचारात सत्ताधारी पक्षांवर राज्यातील विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप, जोरदार टीका टिप्पणी होत आहे.





