महाराष्ट्रातल्या राजकारणातले एक जिद्दी व हिंमतबाज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड; उद्धव ठाकरे सेनेकडून शोक व्यक्त

SHARE:

मुंबई -महाराष्ट्रातल्या राजकारणातले एक जिद्दी व हिंमतबाज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, असे राज्यातील ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे. राज्यात अजित पवारांनी सत्ता, संपत्तीचा लाभ घेतला. मंत्रीपद नसले तरी विरोधात बसून त्यांनी वचक ठेवला,“ असे शिवसेनेने म्हटले आहे. राज्यात अनेक मुख्यमंत्री म्हणून येत-जात राहिले, पण अजित पवार यांच्यासारखा नेता राजकारणात होणार नाही.

समाजात काही व्यक्ती अशा असतात की, त्यांच्या अंगी नेतृत्वाचे गुण उपजतच असतात. अजित पवार हे त्यातील एक. शरद पवार यांच्या सावलीतही त्यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. पण मृत्यू अविचारी बनला व त्याने महाराष्ट्राचे हे नेतृत्व आपल्यातून निघून गेले. अजित पवार यांचे विमान बारामतीत कोसळले व त्यात त्यांचे निधन झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र शांत झाला. पवार यांच्या राजकारणावर नव्हे तर राज्यतील समर्थकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवारांना शिवेसेनेकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री “अजित पवार हे सतत फिरत आणि दौऱ्यावर असायचे. आता ते अशा दौऱ्यावर गेले की, पुन्हा परत येणार नाहीत. अजित पवारांचे अचानक जाणे म्हणजे, महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात, लाखों लोकांच्या व्यक्तिगत जीवनात पोकळी निर्माण झाल्यासारखे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ते शरद पवारांचे पुतणे म्हणून आले. शरद पवारांसारख्या व्यक्तीच्या सावलीत राहून, त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. व आपल्या कर्तृत्वाने त्यांनी स्वतःची वेगळी वाट निर्माण केली. त्यांचा आताचा प्रवास शरद पवारांपासून वेगळा होता,“ असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे.

राज्यात पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणून येत-जात राहिले. “शरद पवार यांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारांच्या समोर अजितदादांनी ४० आमदारांसह स्वःताकडे नेला, व भाजपबरोबर सत्तेत सामील झाले. पण शरद पवार व कुटुंबाशी त्यांची नाळ कायम राहिली. कालच्या महानगरपालिका निवडणुकीत शरद पवार, अजित पवारांचे पक्ष एकत्र येऊन लढले. जिल्हा परिषद निवडणुकाही ते एकत्र लढणार होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला निघाले होते. पण बारामतीच्या परिसरातच विमान कोसळून अजित पवार कायमचे निघून गेले आहेत.

महाराष्ट्र राज्यात अजित पवार यांना शरद पवारांचा वारसा लाभला. शरद पवार अजित पवारांच्या मागे उभे राहिले. पण मात्र स्वतः अजित पवार यांच्यात प्रचंड कष्ट करण्याची मानसिकता होती. ते ६ वेळा उपमुख्यमंत्री झाले. काटेवाडीतील सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनाचा आरंभ केला. काटेवाडीतील सहकारी सोसायट्यांपासून ते राज्य सहकारी बँक, खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री अशी त्यांनी भरारी घेतली. पृथ्वीराज चव्हाण, विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री म्हणून येत-जात राहिले, पण त्या सगळ्यांच्या मंत्रिमंडळात, अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून कायम राहिले. ते जाणते राजकारणी होते,“ असे शिवसेनेने म्हटले आहे.

राज्यात “७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप स्वतः मोदी यांनी त्यांच्यावर लावले, पण अजितदादांनी महिनाभरात त्याच मोदींच्या पक्षाच्या महाराष्ट्र राज्यातील सरकारमध्ये ते पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. एकदा पहाटे त्यांनी फडणवीसांबरोबर शपथ घेतली. ३५ तासांसाठी उपमुख्यमंत्री बनले व आपल्या विरुद्धच्या सर्व चौकशा बंद करण्याचा आदेश जारी करून ते पुन्हा स्वगृही परतले. व उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले. अजित पवार हे राजकारणात मोठे झाले. तरीही शरद पवारांचे पुतणे, पवारांचे खरे वारसदार म्हणूनच लोक त्यांना ओळखत होते. अजित पवारांनी मंत्रीपद नसले तरी विरोधात बसून, त्यांनी प्रशासनावर वचक ठेवला. प्रशासनाकडून कामे करून घेण्यासाठी जाणकार नेते होते. भाषण करताना टाळ्या मिळवण्याच्या नादात ते अनेकदा फसले. त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले. परंतु अलीकडील काही वर्षांत त्यांच्या वागण्या-बोलण्यात ते संयम बाळगत होते,“ असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे.

राज्याच्या राजकारणातील प्रभावी “मंत्री म्हणून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. ते निर्णय घेऊन मोकळे होत आणि यशस्वीपणे कृतीत करत. राजकारणात स्पष्ट, परखड बोलणारे नेते होते. वेळेची शिस्त, स्वच्छता व टापटीपपणा त्यांना प्रिय होता. फालतू आश्वासन देणे त्यांच्या कामाच्या शैलीत बसत नव्हते. अजित पवार हे सध्याच्या राजकारणातील मोठे नेते होते. अजित पवारांवर अवलंबून असलेल्या लोकांचे भविष्य अंधःकारमय झाले आहे. महाराष्ट्राच्या मराठी राजकारणात , महाराष्ट्राने पुन्हा एकदा एक कर्तबगार आणि खंबीर नेता गमावला आहे. अजित पवार यांच्यासारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणातून निघून गेला आहे. अजित पवारांच्या जिवावर आणि नावावर राजकारण करणारा एक मोठा वर्ग अनाथ झाला आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणातले एक जिद्दी आणि हिंमतबाज व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, असे ठाकरे शिवसेनेने म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा