सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी बापाकडूनच अल्पवयीन मूलीची हत्या; नांदेड मधे माणुसकीला काळिमा फासणारी घटना

SHARE:

नांदेड – जिल्ह्यात सरपंचपदाच्या निवडणूकीसाठी बापाकडूनच अल्पवयीन मूलीची हत्या करण्यात आली आहे. सरपंचपदाची निवडणूक लढवण्यात ३  मुलांचा अडथळा येत होता. एका बापाने अल्पवयीन मूलीला कॅनॉलमध्ये टाकून मारले आहे, ही घटना नांदेडमध्ये घडली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात ही घटना घडली आहे. सरपंचपदाची निवडणूक लढवण्यात ३  मुलांचा अडथळा येत होता. या कारणाने वडिलांनी स्वःताच्या मूलीला मारले आहे.

नांदेडमध्ये सरपंचपदाची निवडणूक लढण्यासाठी जन्मदात्या पित्याने आपल्या ७  वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तेलगंणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून देऊन तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपीला अटक केले आहे. आरोपीला 3 अपत्य आहेत. त्याला गावातील सरपंचपदाची निवडणूक लढवायची होती. मात्र, महाराष्ट्रात ३  किंवा त्यापेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही, असा नियम आहे.

निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून एका बापाने स्वःताच्या अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे. मुखेड तालुक्यात ही घटना घडलेली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पांडुरंग कोंडामंगले असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे. त्याचा बाऱहाळी येथे हेअर कटिंगचे दुकान आहे. त्याला ३  मुले आहेत. ३  दिवसांपूर्वी पांडुरंग कोंडामंगले याने साहित्य खरेदीसाठी जात असल्याचे पत्नीला सांगून ७  वर्षाची अल्पवयीन मूलगी प्राची कोंडमंगले हिला सोबत घेऊन गेला. त्यानंतर तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात बोधन रोडवरील कॅनॉलमध्ये फेकून दिले. त्यानंतर तो घरी एकटाच परत आला. कॅनॉलमध्ये अल्पवयीन मूलीचा मृतदेह मिळाल्यान तेलंगणा पोलिसांनी तपास केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

या घटनेची संपुर्ण माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी ३० जानेवारी २०२६ रोजी मुखेड शहरात येऊन पांडुरंग कोंडामंगले यांना अटक केले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची त्याची तयारी चालली होती. पण ३  मुले असल्याने आपल्या निवडणुकीत तिसरे अपत्य अडसर ठरु नये म्हणून अल्पवयीन मूलीची हत्या केल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा